बॉलिवूडची बेबी डॉल अर्थात अभिनेत्री सनी लिओनी सध्या आपल्या फॅमिलीसोबत वेळ घालवते आहे. ती लॉस एंजेलिसमध्ये आपल्या मुलांसह आणि पती डेनियलसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करतेय. सोशल मीडियाच्या माध्यमातून सनी फॅन्सच्या संपर्कात असते. सनी आपल्या पतीसोबत मस्ती करताना दिसते. सोशल मीडियावर सध्या तिचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओत सनी आपल्या पतीसोबत प्रँक करताना दिसतेय. 


सनी लिओनीने नुकताच तिचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यात ती आपल्या घरातीस गार्डनमध्ये दिसतेय. व्हिडिओमध्ये सनी म्हणते आहे, जेव्हा ती संध्याकाळच्या पार्टीची तयारी करीत होती, तेव्हा डेनियलने तिला काहीच मदत केली नाही आणि तो दिवसभर सनबाथ घेत बसला. पतीवर नाराज झालेल्या सनीने त्याला धडा शिकवताना दिसली आणि मित्रांसोबत मिळून तिने एक प्रँक केला. 

डेनियल झोपेत असताना सनीने त्याच्याजवळ जाऊन पाण्याने भरलेले फुगा फोडला, त्यामुळे डेनियल झोपेतून अचानक जागा झाला. व्हिडीओ शेअर करताना सनी लिहिते, 'मी आता काय बोलू? डेनियलसोबत प्रँक करणे खूप सोपे आहे. सनी म्हणाली तो माझी नेहमी मदत करतो, म्हणूनच तो झोपला होता. डेनियल खूप चांगला पती आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sunny leone prank on husband daniel weber with water balloon watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.