ठळक मुद्देसनी लिओनी नुकतीच ‘अर्जुन पटियाला’ या चित्रपटात झळकली. या चित्रपटात ती एक आयटम सॉन्ग करताना दिसली.

बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनी कधी काय करेल, याचा नेम नाही.  सनीच्या सोशल अकाऊंटवरचे चित्रविचित्र फोटो व व्हिडीओ पाहून तुम्हालाही हे पटेल. पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह असते. स्वत:चे रोज नवे व्हिडीओ, फोटो ती शेअर करत असते.  तिच्या सिनेमांची आणि प्रोजेक्टची जेवढी चर्चा होते तेवढीच  तिच्या खासगी आयुष्याविषयी होते. नुकताच सनीने एक फोटो शेअर केला. या फोटोत सनी काय करतेय तर जुने कपडे ट्राय करतेय. होय, अगदी तुम्ही आम्ही करतो तसेच. पण हे काय? एकही जुना कपडा तिला फिट होईना.  


सनी लिओनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला असून सध्या तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘मी देखील तुमच्यासारखीच एक व्यक्ती आहे. हे जुने कपडे  मला फिट येतील, असे वाटले होते. पण नाही,  पण असे काही झाले नाही,’ असे मजेशीर कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.  सनीचा हा फोटो आणि त्याचे मजेशीर कॅप्शन चाहत्यांना जाम आवडले असून या फोटोवर कमेंटचा वर्षाव होत आहे.


सनी लिओनी नुकतीच ‘अर्जुन पटियाला’ या चित्रपटात झळकली. या चित्रपटात ती एक आयटम सॉन्ग करताना दिसली.  लवकरच एका मल्याळम चित्रपटातही ती झळकणार आहे. ‘रंगीला’ या  चित्रपटातून ती मल्याळम चित्रपटसृष्टीत पर्दापण करतेय. ‘कोका कोला’नामक कॉमेडी चित्रपटातही सनीची वर्णी लागली आहे. याशिवाय आणखी एक काम सनीने हाती घेतले आहे. ते म्हणजे, बच्चेकंपनीसाठीची शाळा. होय, सनी व तिचा पती डेनियल वीबर लवकरच एक शाळा उघडणार आहेत.
 

Web Title: sunny leone photos while wearing old clothes gets viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.