ठळक मुद्देसध्या सनी एमटीव्हीवरचा ‘स्प्लिट्विला’ हा लोकप्रिय शो होस्ट करतेय.

सोशल मिडियावर ब-यापैकी सक्रिय असलेली हॉट आणि बोल्ड अभिनेत्री सनी लियोनी सध्या दुबईत आपल्या पतीसोबत सुट्टी एन्जॉय करतेय.  या हॉलिडेचे काही फोटो तिने शेअर केले आहेत. यातला ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट बिकिनीतील तिच्या एका हॉट फोटोने सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.  या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाची बिकिनी घातली आहे. 

  दुबईतील एका स्विमिंग पूलमध्ये शांतपणे पहुडलेल्या सनीचा हा बोल्ड अंदाज घायाळ करणारा आहे.

काही मिनिटांतच तिच्या या फोटोला लाखोंच्या वर लाइक्स मिळाले आहेत.

एका फोटोत ती पतीसोबत दिसतेय. यात दोघांचे बॉन्डिंग स्पष्ट दिसतेय.


काही महिन्यांपूर्वी सनीने आपल्या इन्स्टा अकाउंटवर आपले एक नवीन आणि हटके फोटोशूट शेअर केले होते. या फोटोमध्ये ती  ‘जलपरी’च्या  वेशात दिसत होती. यात तिच्या मादक अदा आणि बोल्ड  अदा पाहून   तिचे चाहतेही खल्लास झाले होते.  

भारतीय-कॅनेडियन असलेली सनी लिओनी मुळात पोर्नस्टार आहे.   सनीने ‘जिस्म 2’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड पदार्पण केले होते. आज सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते. बिग बॉसच्या 5 व्या सिझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती. याच कार्यक्रमामुळे ती जास्त प्रकाशझोतात आली होती.

दीर्घकाळापासून सनी लिओनी सिनेमात झळकली नाही. ‘करणजीत कौर : द अनटोल्ड स्टोरी आॅफ सनी लिओनी’ या वेबसीरिजमध्ये  ती शेवटची बोल्ड लूकमध्ये पाहायला मिळाली. 
सध्या सनी एमटीव्हीवरचा ‘स्प्लिट्विला’ हा लोकप्रिय शो होस्ट करतेय. लवकरच ‘मोतीचूर चकनाचूर’ या चित्रपटात ती एक आयटम नंबर करताना दिसेल.
 

Web Title: sunny leone looks stunning in bikini as she enjoys in dubai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.