Sunny leone husband daniel weber gifts diamond necklace on anniversary | अबब..! लग्नाला १० वर्षे झाली म्हणून पती डॅनिअलने सनी लिओनीला दिले हे महागडे गिफ्ट

अबब..! लग्नाला १० वर्षे झाली म्हणून पती डॅनिअलने सनी लिओनीला दिले हे महागडे गिफ्ट

बॉलिवूडची 'बेबी डॉल' सनी लिओनी आणि तिचा पती डॅनिअलच्या लग्नाला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. लग्नाच्या वाढदिवसाला डॅनिअलने पत्नी सनीला महागडा डायमंडचा हार गिफ्ट म्हणून दिला आहे. सनीने सोशल मीडियावर हार घालून व्हिडीओ शेअर केला आहे आणि पतीला थँक्यू म्हटलं आहे. 

हार घालून व्हिडिओ पोस्ट करताना सनी लिओनीने लिहिले की, 'खूप खूप आभार डॅनिअल वाढदिवसाला हिऱ्याचा हार दिल्याबद्दल. हे  खरोखर एक स्वप्न आहे. लग्नाला 10 वर्षे झाली आहेत आणि आपण 13 वर्षे एकत्र  आहेत.

पती डॅनिअल आणि मुलांसोबत सनी कायमच पाहायला मिळते. सोशल मीडियावर ती त्यांच्यासोबतचे फोटो शेअर करत असते. सध्या ती तिच्या मुलांसह कुटुंबासह अधिक वेळ घालवतना दिसते.

सनी लियोनला बॉलीवूडमध्ये येऊन अजून फारसा कालावधी झालेला नाही, अल्पावधीतच तिने रसिकांची पसंती मिळवली. सनी लियोन ही पहिल्यांदा 'बीग बॉस-५' या रिअँलिटी शोद्वारे २0११ मध्ये पहिल्यांदा दिसली होती...ती. त्यानंतर 'जिस्म-२' या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये प्रवेश केला होता. . सनी लिओननं अंधेरी पश्चिम येथे एका आलिशान इमारतीतल १२ व्या मजल्यावर अपार्टमेंट रजिस्टर केलं. २८ मार्च २०२१ रोजी तिनं या अपार्टमेंटची १६ कोटी रूपयांना खरेदी केली होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sunny leone husband daniel weber gifts diamond necklace on anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.