sunny leone has been trolled on social media for copying for charity an artwork originally painted by french illustrator malika favre | केली अशी ‘कलाकारी’ की सोशल मीडियावर ट्रोल झाली सनी लिओनी

केली अशी ‘कलाकारी’ की सोशल मीडियावर ट्रोल झाली सनी लिओनी

ठळक मुद्देसनीने बनवलेले हे पेन्टिंग Malika Favre या फ्रेन्च महिला चित्रकाराने काढलेल्या चित्राची नक्कल असल्याचा आरोप नेटक-यांनी केला.

सनी लिओनी एक अभिनेत्री आहे, तशीच एक चांगली चित्रकार. होय,सनी अनेकदा तिच्या मुलांसोबत चित्र काढताना दिसली. आता तर हौसेखातर नाही तर चॅरिटीसाठी सनी पेन्टिंग करू लागलीय. नुकतेच सनीने चॅरिटीसाठी एक पेन्टिंग काढले. हे पेन्टिंग पूर्ण होताच सनीने त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. पण हे काय? हे पेन्टिंग पाहून नेटक-यांनी तिला ट्रोल करणे सुरु केले.


सनीने बनवलेले हे पेन्टिंग Malika Favre या फ्रेन्च महिला चित्रकाराने काढलेल्या चित्राची नक्कल असल्याचा आरोप नेटक-यांनी केला. एका इन्स्टाग्राम अकाऊंटने Malika Favre आणि सनी या दोघांच्या पेन्टिंगचा स्नॅपशॉट शेअर करत ही ‘चोरी’ असल्याचा दावा केला.

अर्थात यानंतर सनीने लगेच यावर खुलासा दिला. ‘आपण सर्व दानाचे महत्त्व जाणतो. अर्थात एका कलाकाराची मूळ कलाकृती चोरी करणे आणि तिला देणगी उभी करण्यासाठी स्वत:ची म्हणून लिलाव करणे चुकीचे काम आहे. मी कुणाचीही नक्कल केलेली नाही. मला या पेन्टिंगचा एक फोटो दिला गेला होता. यानंतर मी त्यानुसार पेन्टिंग बनवण्याचे ठरवले होते. हे पेन्टिंग माझे आहे, हा माझा दावा नाहीच. मी केवळ माझ्या कुंचल्याने एक पेन्टिंग जिवंत केले. खरे तर याचे कौतुक व्हायला हवे. कारण मी बनवलेले हे पेन्टिंग कॅन्सर रूग्णांसाठी निधी उभारण्यासाठी लिलावात काढले जाणार आहे. तरीही माफी मागते. मी मुलांच्या मदतीसाठी हे पेन्टिंग काढले,’ असे तिने लिहिले.
सनीचा उद्देश चांगला होता यात शंका नाही. पण नेटक-यांच्या नजरेतून काहीही सुटत नाही, हेच खरे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: sunny leone has been trolled on social media for copying for charity an artwork originally painted by french illustrator malika favre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.