बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी तिच्या ग्लॅमरस स्टाईलमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. सनी तिच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून सोशल मीडियावर चाहत्यांसाठी पर्सनल आणि प्रोफेशनल अपडेट शेअर करते. अलीकडेच त्याने आपल्या नवीन फोटोशूटचा व्हिडिओ शेअर केला आहे. या फोटोशूटमध्ये सनीने ब्लॅक आउटफिटमध्ये एक पेक्षा एक पोज देताना दिसतेय. 

 'बॅक इन ब्लॅक' असं कॅप्शन तिने हे फोटोशूट शेअर करताना  लिहिले आहे. फोटोशूटमध्ये सनीच्या स्टाईलचे कौतुक करत चाहते थकत नाहीत. सनीने व्हाइट वेडिंग गाऊन परिधान करून फोटोशूट केले होते, ज्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोशूटद्वारे सनीच्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिने लिहिले, मॅरी मी.

सनीने 'जिस्म २’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आज सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते. 'बिग बॉसच्या ५ व्या' सीझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती.

याच कार्यक्रमामुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली आणि तिच्यासाठी बॉलिवूडचे दरवाजे खुले झाले. सनी लियोनी विक्रम भट्ट दिग्दर्शित ‘अनामिका’ सिनेमात काम करते आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sunny leone gives glamorous pose in black outfit see video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.