ठळक मुद्देसनी व डेनिअल या दोघांनी काही वर्षांपूर्वी एका अनाथ मुलीला दत्तक घेतले होते. तिचे नाव त्यांनी निशा असे ठेवलेय.  डेनिअलला घट्ट मिठी मारणारी हीच ती निशा.

बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनी सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असते. तिचे रोज नवे फोटो, व्हिडीओ व्हायरल होतात. पण सध्या सनी नाही तर तिची लेक निशा कौर हिचा एअरपोर्टवरचा व्हिडीओ व्हायरल होतोय. क्युट निशाच्या या व्हिडीओने चाहत्यांना जणू वेड लावले आहे.
सनी लिओनी ‘एमटीव्ही स्प्लिट्सविला 13’च्या शूटींगसाठी गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये होती. काल संध्याकाळी ती मुंबईला परतली. यावेळी एअरपोर्टवरचे चित्र पाहून पापाराझींचे कॅमेरे आपसूक हा क्षण कैद करण्यासाठी पुढे सरसावले. होय, सनीसोबत तिचे तिन्ही मुलं होती. सनीचा पती डेनिअल पत्नी व मुलांना घ्यायला एअरपोर्टवर आला होता. सनी व मुलं एअरपोर्टच्या बाहेर आली आणि डेनिअलला पाहून अक्षरश: आनंदाने बेभान झाली. चिमुकली निशा तर पापाला पाहून लगेच त्याच्याकडे धावली आणि तिने पापाला घट्ट मिठी मारली.

निशाच्या मागे तिचे दोन्ही भाऊही धावत येऊन डॅनिअलच्या गळ्यात पडलेत. आपल्या तिन्ही मुलांना छातीशी कवटाळत डॅनिअल गुडघ्यावर बसला. निशाचा आनंद यावेळी बघण्यासारखा होता. जणू खूप वर्षानंतर पापाला भेटत असल्याचा आनंद तिच्या चेह-यावर होता. व्हिडीओच्या अखेरिस सनी व डेनिअल मास्क उतरवून एकमेकांना किस करतानाही दिसतात.

तूर्तास या व्हिडीओतील बाप लेकीचे प्रेम पाहून चाहतेही गदगद झाले आहेत. या व्हिडीओवर कमेंट्सचा जणू पाऊस पडतोय.
तुम्हाला ठाऊक असेलच की,सनी व डेनिअल या दोघांनी काही वर्षांपूर्वी एका अनाथ मुलीला दत्तक घेतले होते. तिचे नाव त्यांनी निशा असे ठेवलेय.  डेनिअलला घट्ट मिठी मारणारी हीच ती निशा. यानंतर सनी व डेनिअल यांनी सरोगसीद्वारे आणखी जुळ्या मुलांना जन्म दिला. त्यामुळे या कपलला आता एकूण तीन मुले आहेत.  या तिन्ही मुलांसोबतचे फोटो हे कपल वेळोवेळी शेअर करत असते.

लग्नापूर्वी डेनियल आणि सनीने एकमेकांना बरेच वर्ष डेट केले. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा सनी डेनियलला एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये भेटली होती. ज्यामध्ये डेनियलने सनीला इम्प्रेस करण्याचा बराच प्रयत्न केला. परंतु सनीने डेनियलला अजिबात भाव दिला नाही. तिच्यासाठी डेनियल केवळ एक केसोनोवा होता. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: sunny leone daughter nisha hugs daddy daniel weber cutest video currently winning hearts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.