ठळक मुद्देसोनालीसोबत काम करताना सुनील तिच्यावर एकतर्फी प्रेम करू लागला होता. पण तो विवाहित असल्याने त्याने ही गोष्ट कधीच सोनालीला सांगितली नाही. सुनील त्याच्या पत्नीवर प्रचंड प्रेम करत असल्याने त्याला तिला दगा द्यायला नव्हता

सुनील शेट्टी एका अभिनेत्रीच्या प्रेमात पडला होता हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल ना... पण हे खरे आहे सुनील एका अभिनेत्रीवर प्रेम करू लागला होता. पण त्यावेळी त्याचे लग्न झाले असल्याने त्याने ही गोष्ट त्या अभिनेत्रीला सांगितली नाही.

सुनीलने वयाची पन्नासी ओलांडली असली तरी तो एखाद्या तरुण नायकाला लाजवेल इतका फिट आहे. बॉलिवूडमधील सगळ्यात फिट अभिनेत्यांमध्ये त्याची गणना केली जाते. सुनीलने बलवान या चित्रपटापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने दिलवाले, मोहरा, गोपी किशन, रक्षक, बॉर्डर, हेरा फेरी, धडकन, फिर हेरा फेरी यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. त्याने त्याच्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये एक स्थान निर्माण केले आहे. त्याने बिगेस्ट लूझर जितेगा या कार्यक्रमाद्वारे छोट्या पडद्यावर देखील त्याची छाप सोडली आहे.

सुनील शेट्टीचे लग्न माना शेट्टी सोबत झाले असून त्यांना आहान आणि अथिया अशी दोन मुले आहेत. सुनील शेट्टीचे मानासोबत लग्न झाले नसते तर एका अभिनेत्रीसोबत लग्न करण्याची सुनीलची इच्छा होती. सुनीलचे हे सिक्रेट त्याचा अभिनेता गोविंदाने एका मुलाखतीत सांगितले होते. गोविंदाने सांगितले होते की, सुनील विवाहित नसता तर त्याने सोनाली बेंद्रेसोबत नक्कीच लग्न केले असते.

सोनाली आणि सुनील यांनी कहर, सपूत, टक्कर यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. त्यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडत असे. सोनालीसोबत काम करताना सुनील तिच्यावर एकतर्फी प्रेम करू लागला होता. पण तो विवाहित असल्याने त्याने ही गोष्ट कधीच सोनालीला सांगितली नाही. सुनील त्याच्या पत्नीवर प्रचंड प्रेम करत असल्याने त्याला तिला दगा द्यायला नव्हता आणि त्याचमुळे त्याने ही गोष्ट कधीच सोनालीला सांगितली नाही.

सोनालीचे त्यावेळी लग्न देखील झालेले नव्हते. सोनालीने काही वर्षांनंतर गोल्डी बहलसोबत लग्न केले. गोल्डी हा दिग्दर्शक असून त्या दोघांना एक मुलगा आहे. 

Web Title: Suniel Shetty was once reportedly in love with Sonali Bendre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.