सुनील शेट्टी पहलवान या चित्रपटाद्वारे चार वर्षांनंतर चित्रपटसृष्टीत कमबॅक केलं आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. 
या चित्रपटानंतर आता तो हॉलिवूडमध्ये झळकमार आहे. या चित्रपटाचे नाव आहे कॉल सेंटर. या चित्रपटात सुनील एका शीख पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे.

कॉल सेंटर हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. भारतातील एका कॉल सेंटर कंपनीने तब्बल ३८१ दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचा घोटाळा केला होता. हे कॉल सेंटर फोनच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांना फसवत होते. हा घोटाळा एका शीख पोलिस अधिकाऱ्याने उघडकीस आणला होता. याच प्रकरणावर कॉल सेंटर या चित्रपटाची पटकथा आधारित आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक जेफ्री चिन करणार आहे. हा चित्रपट इंग्रजी बरोबरच हिंदी आणि तेलुगु या भाषांमध्ये देखील प्रदर्शित केला जाणार आहे. सध्या चीनमध्ये कॉल सेंटरचे चित्रिकरण सुरु असून पुढीच्या वर्षी ऑगस्टमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं बोललं जातंय.

सुनील शेट्टी आजही इतका फिट दिसतो.

त्याच्या फिटनेसबद्दल त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, मी न चुकता रोज सकाळी लवकर उठतो आणि सहा वाजता योगा करतो. मी माझ्या कामात कितीही व्यग्र असलो तरी संध्याकाळी मी जीममध्ये जातो. मी कधीही जीममध्ये गेल्याशिवाय घरी परतत नाही. मी माझ्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देतो. 

 


Web Title: Suniel Shetty Begins Shooting for Lead Role in Hollywood Film 'Call Centre'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.