Suhana khan shares glamorous photo in short black dress with friend | सुहाना खान ब्लॅक शॉर्ट ड्रेसमध्ये दिसतेय ग्लॅमरस, मैत्रिणीसोबतचा शेअर केला फोटो

सुहाना खान ब्लॅक शॉर्ट ड्रेसमध्ये दिसतेय ग्लॅमरस, मैत्रिणीसोबतचा शेअर केला फोटो

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याची मुलगी सुहाना खानची गणना बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत स्टार किड्समध्ये केली जाते. तिने चित्रपटांमध्ये एन्ट्री घेतली नसली तरी सोशल मीडियावर तिचे  फॅन फॉलोइंग एखाद्या सुपरस्टारपेक्षा कमी नाही. त्याचबरोबर सुहानासुद्धा तिच्या चाहत्यांमध्ये चर्चेत राहण्यासाठी सोशल मीडियावर सक्रिय असते. सुहाना पुन्हा एकदा इन्स्टाग्रामवर चर्चेत आली आहे ती तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमुळे. ब्लॅक शॉर्ट ग्लॅमरस स्टायलिश ड्रेसमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसतेय. 


सुहाना खानने त्याच्या मैत्रिणीसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. यात तिने ब्लॅक कलरचा ड्रेस आणि ब्लॅक जॅकेट परिधान केले आहे. फोटोतील मैत्रिणीला सुहाना मिस करत असल्याचे तिने सांगितली.  

सुहाना खान जितकी लाइम लाईटपासून दूर राहते तितके चाहते तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात.  यामुळेच तिचा कोणतेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. सुहाना सध्या न्यूयॉर्कमध्ये असून ती तिचे शिक्षण पूर्ण करते आहे.. सुहाना खान बॉलिवूड डेब्यू करणार, अशी अनेक दिवसांपासून चर्चा आहे.2018 मध्ये तिने वोग मॅगझिनसाठी कव्हर फोटोशूट केले होते. मध्यंतरी संजय लीला भन्साळी सुहानाला लॉन्च करणार, अशी बातमी होती. कुण्या बड्या दिग्दर्शकाने सुहानाला लॉन्च करावे, ही शाहरूखची इ्च्छा होती. शाहरूखला काहीतरी भव्य हवे होते.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Suhana khan shares glamorous photo in short black dress with friend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.