ठळक मुद्देसुहाना खान बॉलिवूड डेब्यू करणार, अशी अनेक दिवसांपासून चर्चा आहे.  नुकतेच तिने सोशल मीडियावर आपले अकाउंट प्रायव्हेट अकाउंट पब्लिक केले आहे.

बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खानची लेक सुहाना खान इंडस्ट्रीतील सर्वाधिक लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे. सुहाना खानचे फोटो, तिचे व्हिडीओ कायम चर्चेत असतात. तूर्तास कोरोना व्हायरसमुळे सुहाना अमेरिकेत अडकून पडली आहे. अगदी घरात बंद आहे. यामुळे सुहाना कमालीची दु:खी आहे. इतकी की, तिच्या डोळ्यांत अश्रू आहेत. जगभर थैमान घालणा-या कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी घोषीत करण्यात आली आहे. शाहरूखची 19 वर्षांची लेक सुहाना अमेरिकेच्या न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीत शिकतेय. सुहानाही कोरोनाच्या धास्तीमुळे घरात कोंडून घ्यावे लागतेय. पण यामुळे तिच्या डोळ्यांत अश्रू आलेत.

सुहानाने नुकतेच इन्स्टाग्रामवर स्वत:चे काही फोटो शेअर केलेत. यात ती फुल मेकअपमध्ये दिसतेय. ओठांवर लाल लिपस्टिक, डोळ्यांत काजळ, स्टाईलिश केस. तिला पाहून बाहेर जाण्यासाठी ती रेडी झाली असावी असे वाटतेय. पण कदाचित कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे तिला घरातून बाहेर पडता आले नाही.
सुहाना खान बॉलिवूड डेब्यू करणार, अशी अनेक दिवसांपासून चर्चा आहे.  नुकतेच तिने सोशल मीडियावर आपले अकाउंट प्रायव्हेट अकाउंट पब्लिक केले आहे. त्यामुळे अल्पावधीतच  सुहाना खानच्या फॉलोअर्सच्या संख्येतही अधिक वाढ झाल्याचे पाहायला मिळते आहे. सुहानाचे जवळपास 1 लाख 40 हजार फॉलोअर्स आहेत. या अकाउंटवर तिने फॅमिलीबरोबर अनेक फोटो शेअर केले आहेत.  

2018 मध्ये तिने वोग मॅगझिनसाठी कव्हर फोटोशूट केले होते. या फोटोशूटनंतर सुहानाच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चा रंगल्या होत्या. पण शाहरुखने या बातम्या धुडकावून लावल्या होत्या.  


मध्यंतरी संजय लीला भन्साळी सुहानाला लॉन्च करणार, अशी बातमी होती.  कुण्या बड्या दिग्दर्शकाने सुहानाला लॉन्च करावे, ही शाहरूखची इ्च्छा होती. शाहरूखला काहीतरी भव्य हवे होते. आता भव्यदिव्य असे काही हवे असेल तर भन्साळींसारख्या लार्जर दॅन लाईफ दिग्दर्शकाशिवाय बॉलिवूडमध्ये अन्य दुसरा पर्याय नाही. कारण भन्साळी त्यांच्या भव्यदिव्य चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यामुळे सुहानाच्या लॉन्चिंगसाठी शाहरूखने भन्साळींच्या नावाला पसंती दिली, असे म्हटले गेले होते. स्वत: सुहानाला पारंपरिक लव्हस्टोरीत इंटरेस्ट नाही. आपण काहीतरी वेगळे करावे. आपला डेब्यू काहीतरी वेगळा आणि यादगार व्हावा, अशी तिचीही इच्छा आहे. 

Web Title: suhana khan locked inside home as us declares national emergency due to coronavirus-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.