ठळक मुद्दे2018 मध्ये तिने वोग मॅगझिनसाठी कव्हर फोटोशूट केले होते. या फोटोशूटनंतर सुहानाच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चा रंगल्या होत्या.

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर अनेक स्टारकिड्स सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. किंगखान शाहरूख खानची लेक सुहाना खान त्यापैकीच एक. यापूर्वी सुहाना अनेकदा वेगवेगळ्या कारणांनी ट्रोल झालीय. पण गप्प बसणा-यांपैकी ती सुद्धा नाही. आता रंगावरून खिल्ली उडवणा-या हेटर्सला तिने खरमरीत उत्तर दिले आहे.
सुहानाने नुकताच इन्स्टावर एक फोटो शेअर केला होता. तिने हा फोटो शेअर केला आणि युजर्सनी तिला ट्रोल करणे सुरु केले. तिच्या रंगावरून तिची खिल्ली उडवली गेली. या खिल्ली उडवणा-यांना सुहानाने जाम फैलावर घेतले. एक भलीमोठी पोस्ट लिहून तिने आपला संताप व्यक्त केला. हो मी रंगाने सावळी आहे, माझी उंची 5 फूट 3 इंच आहे, पण मी जशी आहे, त्यात आनंदी आहे, असे तिने ट्रोलर्सला सुनावले.

काय म्हणाली सुहाना...
सध्या आजुबाजूला ब-याच गोष्टी घडत आहे आणि यापैकीच एका गोष्टीवर व्यक्त होण्याची वेळ आलीये. हा मुद्दा फक्त माझ्या एकटीला लागू होत नाही तर माझ्यासारख्या अनेक मुला-मुलींबाबत हे घडतेय. कोणत्याही कारणाशिवाय त्यांना टीका सहन करावी लागते. माझ्या दिसण्यावर अनेक कमेंट्स केल्या गेल्यात. 12 वर्षांची असताना तुला रंग सावळा आहे म्हणून तू कुरूप दिसतेस, असे मला म्हटले गेले. विशेष म्हणजे, वयाने प्रौढ म्हटल्या जात असलेल्यांनी मला हे सांगितले. आता काय सांगणार?

मुळात आपण सगळेच भारतीय कृष्णवर्णीय आहोत. आपल्या सर्वांचा रंग वेगवेगळा असतो. तुम्ही तुमचा रंग बदलू शकत नाही. सोशल मीडियावरील इंडियन मॅचमेकिंग पाहून किंवा तुम्ही 5 फूट 7 इंचीचे नाहीत, तुमचा रंग गोरा नाहीये म्हणून तुम्ही कुरूप आहात, हे कुटुंबाकडूनच तुमच्या मनावर बिंबवले गेले असेल तर याचा मला खेद आहे. पण माझी उंची 5 फूट 3 इंच आहे आणि माझा रंग सावळा आहे. पण तरीदेखील मी आनंदी आहे. माझ्यामते, मी जशी आहे त्यात आनंदी आहे आणि तुम्हालाही आनंदी राहता यायला हवे, असे सुहानाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

सुहाना खान बॉलिवूड डेब्यू करणार, अशी अनेक दिवसांपासून चर्चा आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर आपले अकाउंट प्रायव्हेट अकाउंट पब्लिक केले आहे. त्यामुळे अल्पावधीतच सुहाना खानच्या फॉलोअर्सच्या संख्येतही अधिक वाढ झाल्याचे पाहायला मिळते आहे. सुहानाचे जवळपास 1 लाख 40 हजार फॉलोअर्स आहेत. या अकाउंटवर तिने फॅमिलीबरोबर अनेक फोटो शेअर केले आहेत.
2018 मध्ये तिने वोग मॅगझिनसाठी कव्हर फोटोशूट केले होते. या फोटोशूटनंतर सुहानाच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चा रंगल्या होत्या. पण शाहरुखने या बातम्या धुडकावून लावल्या होत्या.

सुहाना खानचा जबरदस्त मेकओव्हर...! कधी अशी दिसायची आता इतकी बदलली शाहरूख खानची लेक

आता कोणी काहीही बोलोत, शाहरूखच्या लेकीला फरक पडायचा नाय...!

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: suhana khan on instagram slammed those who make fun on others black skin color

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.