सुहाना खानचा जबरदस्त मेकओव्हर...! कधी अशी दिसायची आता इतकी बदलली शाहरूख खानची लेक

Published: May 22, 2020 03:52 PM2020-05-22T15:52:45+5:302020-05-22T16:08:48+5:30

हॅपीवाला बर्थ डे सुहाना...

बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खानची लेक सुहाना खान इंडस्ट्रीतील सर्वाधिक लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे. आज तिचा वाढदिवस.

आजचा वाढदिवस सुहानासाठी खास आहे. कारण आज ती 20 वर्षांची झाली आहे.

सुहानाने नुकतेच तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट प्रायव्हेटवरून पब्लिक केले. या अकाऊंटवर सुहाना रोज नवे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. गेल्या काही वर्षांत सुहाना प्रचंड बदललीय.

सुहानाचा जन्म 22 मे 2000 रोजी मुंबईत झाला होता.

शाहरूख व गौरीला पहिला मुलगा होता़ दुसरी मुलगी व्हावी अशी त्यांची इच्छा होती. सुहानाच्या जन्माने त्यांची ही इच्छा पूर्ण झाली.

सुहाना सध्या अमेरिकेच्या न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीत शिकतेय.

सुहाना सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे.

सुहानाचे जवळपास 1 लाख 40 हजार फॉलोअर्स आहेत.

2018 मध्ये तिने वोग मॅगझिनसाठी कव्हर फोटोशूट केले होते.

या फोटोशूटनंतर सुहानाच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चा रंगल्या होत्या. पण शाहरुखने या बातम्या धुडकावून लावल्या होत्या.

मध्यंतरी संजय लीला भन्साळी सुहानाला लॉन्च करणार, अशी बातमी होती.

कुण्या बड्या दिग्दर्शकाने सुहानाला लॉन्च करावे, ही शाहरूखची इ्च्छा होती.

पण स्वत: सुहानाला पारंपरिक लव्हस्टोरीत इंटरेस्ट नाही. आपण काहीतरी वेगळे करावे. आपला डेब्यू काहीतरी वेगळा आणि यादगार व्हावा, अशी तिचीही इच्छा आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!