Stunning..! ग्रीन रंगाच्या ब्लेझरमध्ये श्रिया दिसली ग्लॅमरस, See Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 06:30 AM2019-11-27T06:30:00+5:302019-11-27T06:30:00+5:30

श्रियाने नुकताच ग्रीन ब्लेझरमध्ये फोटोशूट केले असून यातील काही फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Stunning ..! Shriya Pilgaonkar looks glamorous in a green blazer, See Photos | Stunning..! ग्रीन रंगाच्या ब्लेझरमध्ये श्रिया दिसली ग्लॅमरस, See Photos

Stunning..! ग्रीन रंगाच्या ब्लेझरमध्ये श्रिया दिसली ग्लॅमरस, See Photos

googlenewsNext

अभिनेत्री श्रिया पिळगावकरने कमी कालावधीत हिंदी चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण केले आहे. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या तिच्या 'मिर्झापूर' या वेबसीरिजला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. तसेच नुकताच तिची हाऊस अरेस्ट ही वेबसीरिज रिलीज झाली आहे. 


श्रिया सोशल मीडियावर सक्रीय असून फोटो शेअर करत असते. तसेच ती तिच्या चाहत्यांना आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट देत असते.


श्रियाने नुकताच ग्रीन ब्लेझरमध्ये फोटोशूट केले असून यातील काही फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोत ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे.

तिने शाहरूख खानसोबत 'फॅन' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अनुभव सिन्हाचा आगामी चित्रपट 'अभी तो पार्टी शुरू हुई है' आणि गुरींदर चड्ढाचा ब्रिटीश पीरिएड ड्रामा 'बीचम हाऊस'मध्ये श्रिया पाहायला मिळणार आहे.

इतकेच नाही तर 'हाथी मेरे साथी' चित्रपटात कल्कीच्या जागी श्रियाची वर्णी लागली आहे. या चित्रपटातून ती दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटात ती पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

श्रिया पिळगावकरने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, २०१९ वर्षाची सुरूवात खूप चांगली झाली असून मी हाथी मेरे साथी चित्रपटात राणा दुग्गाबतीसोबत दिसणार आहे. या चित्रपटात काम करायला मजा येणार आहे आणि या चित्रपटाचा विषय खूप चांगला आहे. माझ्यासाठी हा चित्रपट खूप खास असून पहिल्यांदाच मी त्रिभाषिक चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटातून तमीळ व तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करते आहे.

Web Title: Stunning ..! Shriya Pilgaonkar looks glamorous in a green blazer, See Photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.