मिलिंद सोमणच्या थ्रोबॅक फोटोवर पत्नी अंकिता कुंवरची अजब रिअ‍ॅक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 07:36 PM2021-05-07T19:36:59+5:302021-05-07T19:38:21+5:30

मिलिंद सोमणच्या जुन्या फोटोवर त्याची पत्नी अंकिता कुंवरने केलेल्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Strange reaction of wife Ankita Kunwar on Milind Soman's throwback photo | मिलिंद सोमणच्या थ्रोबॅक फोटोवर पत्नी अंकिता कुंवरची अजब रिअ‍ॅक्शन

मिलिंद सोमणच्या थ्रोबॅक फोटोवर पत्नी अंकिता कुंवरची अजब रिअ‍ॅक्शन

Next

बॉलिवूड अभिनेता, मॉडेल मिलिंद सोमण कधी फिटनेसमुळे तर कधी सोशल मीडियावरील फोटोंमुळे सतत चर्चेत येत असतो. आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचे कारण म्हणजे सोशल मीडियावर त्याने शेअर केलेला जुना फोटो. त्याचा हा फोटो तरूणपणीचा असून तो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. या फोटोसोबतच त्याची पत्नी अंकिता कुंवरने केलेल्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

अभिनेता मिलिंद सोमणने नुकताच सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर केलेला फोटो १९९१ सालचा आहे. या फोटोत तो काश्मीरी आउटफिटमध्ये दिसतो आहे. हा फोटो शेअर करत मिलिंद सोमणने लिहिले की, '१९९१ सालचा फार जुना फोटो पण अत्यंत छान असे काश्मीरी कपडे, एक जोड स्पान्डेक्स शॉर्ट्स आणि दिल्लीचे कडकडीत ऊन....' 


मिलिंद सोमणच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. एका युजरने 'फोटोशूट झाल्यानंतर आपण अभिनेता किंवा मॉडेल ते कपडे आपल्याकडे ठेवू शकतो का? तर दुसऱ्या युजरने फक्त हेअरस्टाइल बदलली आहे, बाकी काही नाही...' असे म्हणत त्याचे कौतुक केले. विशेष बाब म्हणजे मिलिंदच्या फोटोवर त्याची पत्नी अंकिता कुंवरनेदेखील रिएक्शन दिली आहे. या फोटोवर तिने 'Yummnn'अशी कमेंट केली आहे. 


मिलिंद सोमण आणि अंकिता कोंवरने बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर २२ एप्रिल, २०१८ ला लग्न बंधनात अडकले. लग्नानंतर हे कपल बऱ्याचदा चर्चेत येत असते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Strange reaction of wife Ankita Kunwar on Milind Soman's throwback photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app