बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करिना कपूर खान तिसऱ्यांदा दलजीत दोसांझसोबत गुड न्यूज या चित्रपटात काम करत आहे. दलजीत दोसांझच्या गाण्यासोबतच अभिनय कौशल्याची भुरळ फक्त चाहत्या वर्गाला पडली नसून यामध्ये मोठ्या सेलिब्रेटींचा देखील समावेश आहे. या यादीमध्ये आता करीना कपूर खानचादेखील समावेश झाला आहे. नुकताच दलजीतने 'काइली + करीना' हे नवीन गाणे प्रदर्शित केले आहे. यामध्ये करीना कपूरचे नाव घेत दलजीतने गाणे गायले आहे. करीनाने गाणे ऐकल्यावर तिने दलजीतची खूप प्रशंसा केली. 

सोशल मीडियावर याचा व्हिडिओ शेअर करत करीनाने दलजीतला या गाण्याबद्दल शुभेच्छा दिल्या. यासोबतच करीनाने सांगितले की, दलजीत फार बोलका नाही. आम्ही दोघांनी सोबत दोन चित्रपट केले आहे. जरी तो कमी बोलत असला तरी, तो त्याच्या मनातील भावना गाण्यांद्वारे व्यक्त करतो आणि हीच एक गोष्ट मला त्याची आवडते.

करीनाने पुढे सांगितले की, ‘तू गाण्यात म्हणालास की तू माझा चाहता आहेस. पण मला सांगायला आवडेल की मी तुमची खूप मोठी चाहती आहे.

गायक व अभिनेता दलजीत दोसांझने गेल्या काही वर्षांत बॉलिवूडमध्ये विविध भूमिकांतून रसिकांना भुरळ पाडली आहे. त्याने कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. त्याचा फॅन फॉलोविंगदेखील खूप आहे. त्याचे काइली जेनरवर क्रश असल्याचे सांगण्यासाठी तो अजिबात लाजत नाही.

तसेच त्याने त्याची 'उडता पंजाब' व आगामी 'गुड न्यूज' सिनेमातील सहकलाकार करीना कपूरदेखील आवडत असल्याचे सांगितले आहे. 

Web Title: The story of Bollywood's Bebo Kareena Kapoor liked Daljeet Dosanjh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.