ठळक मुद्देलाडला या चित्रीकरणाच्यावेळी दिव्या जो संवाद म्हणताना गोंधळली होती, त्याच संवादावर सतत श्रीदेवी देखील अडखळत होती. ही गोष्ट रवीना आणि शक्ती यांच्या लक्षात आल्यानंतर ते चांगलेच घाबरले होते.

श्रीदेवी यांचे निधन 24 फेब्रुवारी 2018 ला दुबईत झाले. त्यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत सदमा, नागिन, चालबाज, लम्हे यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. अभिनेत्री श्रीदेवी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले. त्यावेळी त्या ५४ वर्षांच्या होत्या. त्यांच्या आकस्मिक झालेल्या निधनामुळे सिनेसृष्टीत आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली होती. 

दिव्या भारतीने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केल्यापासून तिची तुलना श्रीदेवी यांच्याशी केली जात होती. ती श्रीदेवी यांच्यासारखीच दिसते असे अनेकांचे म्हणणे होते. त्यामुळे दिव्या श्रीदेवी यांची लहान बहीण आहे का असा अनेकांना प्रश्न पडला होता. श्रीदेवी यांच्या लाडला या चित्रपटाची आजही चर्चा होते. या चित्रपटात श्रीदेवी यांची जोडी अनिल कपूरसोबत जमली होती. अतिशय गर्विष्ट अशा मुलीची व्यक्तिरेखा श्रीदेवी यांनी या चित्रपटात साकारली होती. या चित्रपटातील श्रीदेवी यांच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. पण तुम्हाला माहीत आहे का, लाडला या चित्रपटासाठी श्रीदेवी निर्माते आणि दिग्दर्शकांची पहिली चॉईस नव्हती. लाडला या चित्रपटात दिव्या भारती मुख्य भूमिका साकारणार होती. 

दिव्याने या चित्रपटासाठी चित्रीकरण देखील करायला सुरुवात केली होती. या चित्रपटात श्रीदेवी अनिल कपूरशी कंपनीच्या बाहेर भांडते आणि त्यानंतर तिच्या गाडीला आग लागते हा प्रसंग दिव्यावर चित्रीत देखील करण्यात आला होता. पण अचानक दिव्याचे निधन झाल्यामुळे हा चित्रपट अर्धवट राहिला.

दिव्याच्या मृत्यूनंतर लाडला या चित्रपटाचे काय करायचे हा प्रश्न चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांना पडला होता. लाडला या चित्रपटासाठी दिव्यानंतर श्रीदेवीचा विचार करण्यात आला आणि तिने देखील या चित्रपटात काम करण्यास लगेचच होकार दिला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी काही विचित्र गोष्टी घडल्या होत्या. एका दृश्यात श्रीदेवी यांच्यासोबत शक्ती कपूर आणि रवीना टंडन होते. या चित्रीकरणाच्यावेळी दिव्या जो संवाद म्हणताना गोंधळली होती, त्याच संवादावर सतत श्रीदेवी देखील अडखळत होती. ही गोष्ट रवीना आणि शक्ती यांच्या लक्षात आल्यानंतर ते चांगलेच घाबरले होते.         

Web Title: Sridevi stuck at the same dialogue as Divya Bharti: Raveena Tandon remembers scene in Laadla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.