ठळक मुद्देहा पुतळा श्रीदेवींचा कमी आणि आयशा टाकियाचा अधिक दिसत असल्याचे या युजरने लिहिले.अन्य एका युजरने ‘ये हमारी श्रीदेवी नहीं’, असे लिहिले.

श्रीदेवी आज आपल्यात नाहीत. पण त्यांची आठवण कायमच सिनेप्रेमींच्या हृदयात राहील. आजही श्रीदेवी या नावासोबत चाहते हळवे होतात. त्याचमुळे मादाम तुँसा या जगप्रसिद्ध संग्रहालयात श्रीदेवींचा मेणाच्या पुतळ्याचे अनावरण होणार म्हटल्यावर चाहते हळवे झालेत. पण हा पुतळा पाहिल्यानंतर मात्र चाहत्यांची निराशा झाली.

सिंगापूरमधील जगप्रसिद्ध मादाम तुसाँ संग्रहालयात श्रीदेवींच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. श्रीदेवींचे पती बोनी कपूर आणि दोन्ही मुली जान्हवी व खूशी यावेळी हजर होत्या. श्रीदेवींच्या मेणाच्या पुतळ्याचे अनेक फोटो लगेच सोशल मीडियावर व्हायरल  झालेत.

 1987 मध्ये प्रदर्शित झालेल्या श्रीदेवींच्या ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटातील ‘हवा हवाई’ हे गाणे चांगलेच लोकप्रिय झाले होते. याच गाण्याच्या लूकमध्ये श्रीदेवींचा मेणाचा पुतळा साकारण्यात आला आहे.पण हा पुतळा पाहून सोशल मीडियावर अनेक नकारात्मक प्रतिक्रियांचा जणू पूर आला. 

काही जण हा पुतळा पाहून आनंदी झालेत. पण काहींची मात्र या पुतळ्याने निराशा केली. श्रीदेवींचा हा मेणाचा पुतळा अजिबात श्रीदेवींसारखा दिसत नाही, अशी प्रतिक्रिया त्यामुळेच अनेकांनी दिल्या.

मादाम तुसाँने पुतळा साकारताना केवळ श्रीदेवींचे कपडे आणि त्यांच्या फिगरवर लक्ष दिले. चेह-यावर काम करायला मात्र ते विसरले, असे एका युजरने लिहिले.

हा मेणाचा पुतळा अजिबात श्रीदेवींसारखा दिसत नाही, असे अन्य एका युजरने लिहिले. एका युजरने तर हा पुतळा बदलण्याची मागणी केली. हा पुतळा अजिबात श्रीदेवींचा दिसत नाही. शक्य तितक्या लवकर तो बदला, असे या युजरने लिहिले.एका युजरने या पुतळ्याची तुलना आयशा टाकियासोबत केली. हा पुतळा श्रीदेवींचा कमी आणि आयशा टाकियाचा अधिक दिसत असल्याचे या युजरने लिहिले. अन्य एका युजरने ‘ये हमारी श्रीदेवी नहीं’, असे लिहिले.

 
 

Web Title: sridevi fans get angry after watching sridevi wax statue at madame tussauds museum fans says she is not our sridevi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.