श्रीदेवींवर असे काही फिदा झाले होते बोनी कपूर, इम्प्रेस करण्याची सोडली नव्हती एकही संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 08:00 AM2020-08-13T08:00:00+5:302020-08-13T08:00:02+5:30

आज श्रीदेवींचा वाढदिवस

sridevi birthday special love story with boney kapoor | श्रीदेवींवर असे काही फिदा झाले होते बोनी कपूर, इम्प्रेस करण्याची सोडली नव्हती एकही संधी

श्रीदेवींवर असे काही फिदा झाले होते बोनी कपूर, इम्प्रेस करण्याची सोडली नव्हती एकही संधी

googlenewsNext
ठळक मुद्देश्रीदेवी आणि बोनी कपूर 2 जून, 1996 रोजी लग्नबेडीत अडकले.

बॉलिवूडची ‘चांदनी’ श्रीदेवी आज आपल्यात नाही. सिनेअवकातून ही चांदणी निखळली खरी. पण चाहत्यांच्या मनोवकाशात मात्र ती अखंड चमचमत राहणार आहे. आज श्रीदेवींचा वाढदिवस.
13 ऑगस्ट 1963 रोजी श्रीदेवींचा जन्म झाला होता. श्री अम्मा यंगेर अय्यपन त्यांचे खरे नाव. श्रीदेवींच्या प्रेमात चाहतेच वेडे झाले नव्हते तर निर्माता बोनी कपूर यांनाही श्रीदेवींनी वेड लावले होते. ही प्रेमकथा आज आम्ही आज सांगणार आहोत.

बोनी कपूर व श्रीदेवींचे प्रेम आधी एकतर्फी होते. 1970च्या दशकात श्रीदेवी तामिळ सिनेमात चमकत असतानाच बोनी कपूर तिच्यावर फिदा झाले होते. 1978 साली श्रीदेवींचा पहिला हिंदी सिनेमा ‘सोलहवां सावन’ रिलीज झाला आणि श्रीदेवींना पाहून बोनी इतके प्रभावित झालेत की, निर्माता म्हणून तिच्यासोबत काम करायचेच असे त्यांनी ठरवले.

 बोनी कपूर ‘मिस्टर इंडिया’चा प्रस्ताव घेऊन श्रीदेवी यांना भेटायला गेले. यावर माझे सर्व काम माझी आई बघते, असे म्हणून श्रीदेवींनी बोनी यांना आईकडे पाठवले. बोनी होणा-या सासूबाईकडे गेलेत. माझी मुलगी सिनेमात काम करेन पण 10 लाख रूपये फी घेईन, असे सासूबाईनी सांगितले. त्याचक्षणी बोनी कपूर यांनी 10 नाही तर 11 लाख देईन सांगितले आणि मिस्टर इंडियासाठी श्रीदेवींचे नाव फायनल झाले.

एका मुलाखतीत बोनी कपूर यांनी सांगितले होते की, श्रीदेवी यांच्या मनात जागा निर्माण करण्यासाठी मला 12 वर्षे लागलीत. तिला जेव्हा पहिल्यांदा स्क्रीनवर पाहिले तेव्हा मी तिच्या प्रेमात पडलो होतो. पण ते एकतर्फी प्रेम होते. श्रीला फॉलो करत करत मी चेन्नईला पोहचलो होतो. मी तिचा आणि तिच्या चित्रपटांचा मोठा चाहता होतो. एक अभिनेत्री म्हणून तिची जी काही इमेज होती, त्याची नेहमी मी स्तुती करत असे.  आमची प्रेमकथा एक खुल्या पुस्तकासारखी होती. तिने मला जीवनात प्रत्येक वळणावर साथ दिली.

‘मिस्टर इंडिया’च्या सेटवर बोनी स्वत: श्रीदेवी यांना कोणता त्रास तर होत नाही ना याची काळजी घ्यायचे. इतकेच नाही तर त्यावेळी त्यांनी श्रीदेवींसाठी वेगळा मेकअप रुम अरेंज केला होता.  

एकीकडे ‘मिस्टर इंडिया’ तयार होत होता आणि दुसरीकडे बोनी कपूर यांचे श्रीदेवींवरील प्रेम आणखी वाढू लागले होते. जेव्हा श्रीदेवी चाँदनी चित्रपटाचे शूटिंग करत होत्या. त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी ते स्वित्झर्लंडला गेले होते. तिथून परतल्यानंतर बोनी कपूर यांनी आपल्या पत्नीला श्रीदेवींबद्दल सांगितले होते.  ही गोष्ट मोनाने स्वत: एका मुलाखतीत सांगितली होती.


मोनाने सांगितले होते की, माझ्यापेक्षा बोनी वयाने दहा वर्षे मोठे होते. जेव्हा माझे लग्न त्यांच्यासोबत झाले तेव्हा मी 19 वर्षांची होते. एकप्रकारे मी त्यांच्यासोबतच मोठी झाले. मात्र  लग्नाला तेरा वर्ष झाली असताना अचानक माझ्या नवºयाचे दुस-या कोणावर तरी प्रेम असल्याचे मला कळले.त्यानंतर आमच्या नात्यात काहीच उरले नाही. आम्ही नात्याला आणखीन एक संधी देऊ शकत नव्हतो कारण त्यावेळी श्रीदेवी प्रेग्नेंट होती.
श्रीदेवी आणि बोनी कपूर 2 जून, 1996 रोजी लग्नबेडीत अडकले. पुढे 25 मार्च,2012 रोजी कर्करोगामुळे मोनाचे निधन झाले. मोना व बोनी कपूर यांना दोन मुले आहेत अर्जुन कपूर व अंशुला. श्रीदेवी यांच्या निधनानंतर बोनी कपूर त्यांच्या चारही मुलांची काळजी घेतात. श्रीदेवी यांच्या निधनानंतर अर्जुन व अंशुलाने सावत्र बहिणी जान्हवी व खुशी यांनादेखील आपलेसे केले आहे. यापूर्वी ते एकमेकांशी बोलत नव्हते.  

Web Title: sridevi birthday special love story with boney kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.