Sridevi and boney kapoor younger daughter khushi will be making her bollywood debut soon reveals father | बोनी कपूरनी दाखवला हिरवा कंदील, खुशी कपूर लवकरच करु शकते बॉलिवूडमध्ये एंट्री

बोनी कपूरनी दाखवला हिरवा कंदील, खुशी कपूर लवकरच करु शकते बॉलिवूडमध्ये एंट्री

जान्हवी कपूरने बॉलिवूडमध्ये डेब्यू केल्यापासून  श्रीदेवी यांची धाकटी मुलगी खुशी कपूरच्या बॉलिवूडमध्ये एंट्रीची चर्चा आहे. खुशी आधीपासूनच सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे आणि ग्लॅमरच्या बाबतीत अनेकांना मात देते. तिचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते आणि या फोटोंना तिचे फॅन्स नेहमीच प्रतिसाद देतात. तिला सोशल मीडियावर चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून ती अनेकवेळा सार्वजनिक ठिकाणी बहीण जान्हवीसोबत दिसते. आता खुशी लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार अशी चर्चा आहे.


बॉम्बे टाईम्सच्या रिपोर्टनुसार  लवकरच जान्हवीची धाकटी बहीण खुशी देखील बॉलिवूडमध्ये एंट्री घेणार आहे. अलीकडेच बोनी कपूरशी झालेल्या चर्चेत त्यांना खुशीच्या पदार्पणाविषयी विचारले असता ते म्हणाले की, “होय, खुशीलासुद्धा अभिनय करायचा आहे आणि तुम्हाला लवकरच याबाबतची अनाउंसमेंट ऐकू येईल.”

बोनी कपूर हे इंडस्ट्रीतील एक सुप्रसिद्ध निर्माता आहेत. परंतु ते खुशीला  लाँच करत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी जान्हवी आणि अर्जुननेही बॉलिवू़मध्ये एंट्री केली पण ती आपल्या वडिलांच्या प्रॉडक्शन हाऊसमधून नाही. खूशी न्यूयॉर्क फिल्म ॲकेडमीमध्ये अभिनयाचे धडे गिरवतेय. न्यूयॉर्क फिल्म ॲकेडमी ही जगातील सगळ्यात प्रसिद्ध फिल्म ॲकेडमीमधील एक असून आजवर बॉलिवूडमधील अनेकांनी यात फिल्म मेकिंगचे, अभिनयाचे शिक्षण घेतले आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sridevi and boney kapoor younger daughter khushi will be making her bollywood debut soon reveals father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.