दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरला कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 01:30 PM2021-05-11T13:30:43+5:302021-05-11T13:31:47+5:30

दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

Southern superstar junior NTR infected with corona | दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरला कोरोनाची लागण

दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरला कोरोनाची लागण

Next

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या कोरोनाच्या विळख्यात सेलिब्रेटीही अडकले आहेत. आता दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यानेच याबद्दल सोशल मीडियावर सांगितले आहे.

ज्युनिअर एनटीआरने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात लिहिले की, 'माझी कोविड -१९ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, कृपया काळजी करू नका, मी एकदम ठीक आहे. मी स्वतःला आणि माझ्या कुटुंबाला वेगळे ठेवले आहे. आम्ही डॉक्टरांच्या देखरेखीखाली सर्व कोरोनाचे नियम पाळत आहोत. मी गेल्या काही दिवसांत माझ्याशी संपर्क साधलेल्या लोकांना त्यांची कोविड चाचणी करवून घेण्याची विनंती करतो. सुरक्षित रहा. 


ज्युनिअर एनटीआरने सोशल मीडियावर ही माहिती दिल्यानंतर त्यांचे चाहते पोस्टवर कमेंट करून लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

एस.एस. राजामौलीच्या बहुप्रतिक्षित चित्रपट आरआरआरमध्ये ज्युनिअर एनटीआर दिसणार आहे. या चित्रपटात तो अभिनेता राम चरण सोबत महत्वाची भूमिका साकारत आहे. आरआरआर हा एक पीरियड ड्रामा सिनेमा आहे, हा चित्रपट दोन तेलुगू स्वातंत्र्यसेनानी अल्लूरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्या जीवनावर आधारित आहे.

या चित्रपटात राम चरण अल्लुरी सीताराम राजूच्या भूमिकेत दिसणार असून ज्युनिअर एनटीआर कोमाराम भीमच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट मुख्य अभिनेत्री आहे. याशिवाय अभिनेता अजय देवगणसुद्धा दिसणार आहे. हा चित्रपट १३ ऑक्टोबरला तेलगूसह इतर भाषेत प्रदर्शित होणार आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Southern superstar junior NTR infected with corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app