केजीएफचा  सुपरस्टार अभिनेता यश सध्या सर्वत्र चर्चेत आहे. एकतर तो अलीकडेच एका  मुलीचा बाप झाला आहे तर दुसरे म्हणजे तो त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत असल्याचं समजतंय. आता नुकताच त्याने त्याची मुलगी आर्या हिचा एक क्यूट व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. हा व्हिडीओ चाहत्यांना भलताच भावला आहे. 

कितीही मोठा स्टार असला तरीही तो मुलांच्या बाबतीत संवेदनशील असतोच. आता साऊथच्या या सुपरस्टारचेच बघा ना. अभिनेता यश हा त्याच्या मुलीच्या विश्वात एवढा रममाण झालाय की, त्याला अशातच म्हणे चित्रपटाच्या सेटवर जायलाही कंटाळा येतो. तो त्याच्या मुलीसोबतच जास्तीत जास्त वेळ घालवत असल्याचे कळतेय. त्याने नुकताच शेअर केलेल्या व्हिडीओत त्याची मुलगी आर्या ही सर्व चाहत्यांना हॅलो करत आहे. यश तिला सर्वांना हॅलो करायला शिकवत असल्याचे दिसतेय. या व्हिडीओत त्याची मुलगी आर्या खूपच क्यूट दिसत आहे. हा व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडल्याचे समजतेय. 

यशच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास, तो केजीएफच्या दुसऱ्या चॅप्टरसाठी शूटिंग करतो आहे. हा चित्रपट २०२० मध्ये रिलीज होणार असल्याचे कळतेय. या चित्रपटात संजय दत्त देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे कळतेय.    

              

Web Title: South superstar Yash shared Daughter's cute video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.