ठळक मुद्देआता हा सिनेमा येऊन २१ वर्ष झाली असून आनंद खूपच बदलला आहे. तो खूपच हँडसम दिसत असून त्याच्या लूकवर मुली फिदा आहेत. त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात सौंदर्यासोबतच केली होती.

सूर्यवंशम हा चित्रपट २१ मे १९९९ ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला कालच २१ वर्षं पूर्ण झाली असून या चित्रपटात अमिताभ बच्चन, सौंदर्या, जयासुधा, कादर खान, अनुपम खेर, मुकेश ऋषी, बिंदू यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटात अमिताभ मुलगा आणि वडील या दुहेरी भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट प्रदर्शित झाला, त्यावेळी या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन करता आले नव्हते. पण सोनी मॅक्सवर हा चित्रपट अनेकवेळा दाखवण्यात आल्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना आवडता चित्रपट बनला.

सूर्यवंशम या चित्रपटात हिरा ठाकूरच्या मुलाची भूमिका बालकलाकार आनंद वर्धनने साकारली होती. इतक्या वर्षांनंतर हा लहान मुलगा आता कसा दिसतो हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता नक्कीच असेल. 'सुर्यवंशम'च्या एका सीनमध्ये अमिताभ यांना तो विष असलेली खीर देताना दिसला होता. त्यावेळी त्याची ही भूमिका चांगलीच गाजली होती. आता हा सिनेमा येऊन २१ वर्ष झाली असून आनंद खूपच बदलला आहे. तो खूपच हँडसम दिसत असून त्याच्या लूकवर मुली फिदा आहेत. त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात सौंदर्यासोबतच केली होती. तो प्रसिद्ध गायक पी बी श्रीनिवास यांचा नातू असून त्याने बालपणी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने इंजिनिअरिंग केले असून लवकरच अभिनयक्षेत्रात तो कमबॅक करणार आहे. तो चित्रपटांच्या पटकथा वाचत असून लवकरच अभिनयक्षेत्रात यायचे हे त्याने पक्के ठरवले आहे. तो इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रिय असून त्याचे अनेक फोटो आपल्याला त्याच्या अकाऊंटवर पाहायला मिळतात.

कुटुंबव्यवस्था आणि नातेसंबंधांवर भर देणारा, विविध भावभावनांची सरमिसळ असलेला सूर्यवंशम हा चित्रपट तेलुगु दिग्दर्शक ई. व्ही. व्ही. सत्यनारायण यांचा बॉलिवूडमधील पहिला चित्रपट होता. त्यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिला आणि एकमेव हिंदी सिनेमा असून या चित्रपटातील दोन्ही नायिका या दाक्षिणात्य अभिनेत्री आहेत.

Web Title: sooryavansham child artist Ananda Vardhan looking very handsome now PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.