As soon as the trailer of 'Durgamati' was released, Anushka Shetty's fans trolled Bhoomi Pednekar | 'दुर्गामती'चा ट्रेलर रिलीज होताच अनुष्का शेट्टीच्या चाहत्यांनी भूमी पेडणेकरला केले ट्रोल

'दुर्गामती'चा ट्रेलर रिलीज होताच अनुष्का शेट्टीच्या चाहत्यांनी भूमी पेडणेकरला केले ट्रोल

भूमी पेडणेकरचा चित्रपट दुर्गामतीचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. हा चित्रपट ११ डिसेंबरला अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. दुर्गामतीमधील भूमिकेसाठी भूमी पेडणेकरचे कौतूक झाले तर दुसरीकडे दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्री अनुष्का शेट्टीचे चाहते दुर्गामतीमुळे जास्त खूश नाहीत. दुर्गामती अनुष्का शेट्टीचा चित्रपट भागमतीचा अधिकृत रिमेक आहे आणि चाहते चित्रपट आणि अभिनेत्रीची तुलना करत आहेत.


चाहत्यांचे म्हणणे आहे की भागमतीमध्ये अनुष्काने जसा परफॉर्मन्स दिला आहे तसा भूमी देऊ शकत नाही. एका चाहत्याने लिहिले की, माफीसोबत म्हणेन की तू चांगली अभिनेत्री आहे पण लेडी सुपरस्टार अनुष्का शेट्टी सारखा स्क्रीन प्रेजेंससोबत टक्कर देऊ शकत नाही. या सीनचे वेगळेच चाहते आहेत. अनुष्का शेट्टी या चित्रपटात आग होती. असो शुभेच्छा. 


दुसऱ्या फॅनने भागमतीचा पोस्टर शेअर करून लिहिले की, याला म्हणतात अंगावर काटे उभे राहणे. याला म्हणतात खतरनाक. याला म्हणतात जबरदस्त परफॉर्मन्स. एका दुसऱ्या चाहत्याने लिहिले की, कितीही मेहनत कर पण अभिनय कौशल्यासोबत मॅच करू शकत नाही.


अनुष्का शेट्टीने अद्याप दुर्गामतीवर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. हॉरर थ्रिलर चित्रपट भागमती २६ जानेवारी, २०१८ला रिलीज झाला होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटदेखील अशोक यांनी दिग्दर्शित केला होता.

दुर्गामती चित्रपटात भूमी पेडणेकर हिने चंचल चौहान नामक मुलीची भूमिका केली आहे. तिच्यासोबत या चित्रपटात अर्शद वारसी, जिशु सेनगुप्ता, माही गिल आणि करण कपाडीया मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचे पहिले शीर्षक दुर्गावती होते पण नंतर बदलून दुर्गामती केले. २०२०मध्ये भूमी पेडणेकरचा रिलीज होणारा तिसरा सिनेमा आहे. यापूर्वी ती भूत आणि डॉली किट्टी और वो चमकते सितारेमध्ये झळकली होती. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: As soon as the trailer of 'Durgamati' was released, Anushka Shetty's fans trolled Bhoomi Pednekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.