Sonu sood honoured sdg special humanitarian action award | अभिमानास्पद ! कोरोना संकटात गरजूंना मदत करणाऱ्या सोनू सूदला संयुक्त राष्ट्राचा पुरस्कार

अभिमानास्पद ! कोरोना संकटात गरजूंना मदत करणाऱ्या सोनू सूदला संयुक्त राष्ट्राचा पुरस्कार

बॉलिवूडमध्ये व्हिलनची भूमिका साकारणार सोनू सूद सध्या आपल्या फिल्मी करिअरपेक्षा सामाजिक कार्याला घेऊन चर्चेत आहे. लॉकडाऊनमध्ये सोनूने अनेकांना मदतीचा हात पुढे केला विशेष म्हणजे त्याने हजारो स्थलांतरित मजुरांना त्याने सुरक्षित घरी पोहोचवले. सोनूचे सामाजिक कार्य अजूनही सुरु आहे, त्याच्या या कार्याची दखल फक्त देशातच नाही तर विदेशात देखील घेतली गेली आहे. सोनूच्या कामाचा गौरव करत संयुक्त राष्ट्राने (United Nations) त्याचा सन्मान केला आहे. संयुक्त राष्ट्र संघाकडून त्याला एसडीजी स्पेशल ह्युमॅनीटेरीयन एक्शन (SDG Special Humanitarian Action) पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. 

या पुरस्तकार मिळाल्यानंतर सोनू आनंद व्यक्त करताना म्हणाला, मी जे काही केले ते माझ्या देशवासीयांसाठी केलं. हे करताना माझी कोणत्याही अपेक्षा न नव्हती. 

कोरोनाच्या महामारीत सोनूने गरजूंना सर्वतोपरी मदत केली. यानंतरही त्याच्या मदतीचा ओघ सुरु आहे. विदेशातील गरिब विद्यार्थ्यांच्या शिक्षणापासून तर शेतात राबणा-या शेतक-यांपर्यंत अशा अडल्या नडल्या सर्वांना शक्य ती मदत देण्याचा त्याचा प्रयत्न आहे.

मदतीचं दुसरं नाव म्हणजे सोनू सूद
मदतीचं दुसरं नाव म्हणजे सोनू सूद अशीच ओळख सोनू सूदची बनली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून सोनू सूदकडे मदत मागण्यात येत आहे. सोनूही आपल्या परीने शक्य तितक्यांना मदत करण्याचा व गरजवंतांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. या दरम्यान, सोनूने अनेकांना मदत केली आहे. कित्येकांना मोफत उपचार करत जीवदान दिले आहे. सोनूचे हे काम आता एक चळवळ बनत आहे.
 

‘मला भेटा मग सांगतो...’; गरीबांकडून पैसे उकळणाऱ्यांवर भडकला सोनू सूद

 

दिलदार सुपरहिरो! सिम कार्डवर सोनू सूदचं चित्र, अभिनेत्याने दिली भन्नाट रिअ‍ॅक्शन

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sonu sood honoured sdg special humanitarian action award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.