ठळक मुद्देया चित्रपटातील सोनम साकारत असलेली झोयाची भूमिका अभिनेत्री मंदिरा बेदीवर आधारित असल्याची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. 2003 च्या वर्ल्ड कप सामन्यांचे समालोचन मंदिरा बेदी करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते.

सोनम कपूरचा एक लडकी को देखा तो ऐसा लगा हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. यानंतर ती आता जोया फॅक्टर या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात झोया सिंग ही व्यक्तिरेखा ती साकारणार असून या चित्रपटातील सोनमची भूमिका एका अभिनेत्रीवर आधारित असल्याची चर्चा सध्या रंगली  आहे.

जोया फॅक्टर या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा करत असून याची निर्मिती फॉक्स स्टुडिओ करत आहे. जोया फॅक्टर या अनुजा चौहान यांच्या कादंबरीवर आधारित जोया फॅक्टर या चित्रपटाची कथा असून कथेच्या मागणीनुसार चित्रपटात काही बदल करण्यात आले आहेत. जोया फॅक्टर ही कादंबरी तुम्ही वाचली असेल तर तुमच्या लक्षात येईल ही यात जोयाचे पात्र जाहिरात प्रतिनिधीचे होते. ती या क्षेत्रात काम करत असतानाच भारतीय क्रिकेट टीमची ती लकी चार्म बनते असा कादंबरीत उल्लेख आहे. त्याचप्रमाणे चित्रपटात देखील आपल्याला हीच कथा पाहायला मिळणार आहे. पण या कथेत आणखी काही बदल करण्यात आलेले आहेत. या चित्रपटातील सोनम साकारत असलेली झोयाची भूमिका अभिनेत्री मंदिरा बेदीवर आधारित असल्याची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. 2003 च्या वर्ल्ड कप सामन्यांचे समालोचन मंदिरा बेदी करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते. त्यामुळे झोयाचे पात्र आणि मंदिरा यांच्यात साम्य असल्याचे म्हटले जात आहे.

जोया फॅक्टरचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटात सोनमसोबत आपल्याला तिचा काका संजय कपूरला देखील एका महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. आपल्या काकासोबत काम करण्याची सोनमची ही पहिलीच वेळ आहे. तिने एक लडकी को देखा तो ऐसा लगा या चित्रपटात वडिलांसोबत काम केले होते.

 

जोया फॅक्टरा या चित्रपटात डुलकर सलमान सोनमच्या नायकाची भूमिका साकारणार असून त्याच्यासोबत काम करण्याची तिची पहिलीच वेळ आहे. डुलकर सलमान हा प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता असून त्याने इरफान खानच्या कारवाँ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केली.

Web Title: Sonam’s character inspired by Mandira Bedi?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.