ठळक मुद्देसोनम ही बॉलिवूडमध्ये तिच्या अभिनयासोबतच फॅशन स्टेटमेंटसाठी ओळखली जाते. त्यामुळेच तिचा हा फोटो पाहून तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसत आहे. सोनमच्या या लूकची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

सोनम कपूर नेहमीच तिच्या चाहत्यांसोबत फोटो काढताना, त्यांना ऑटोग्राफ देताना दिसते. तिचा एक फोटो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत ती तिच्या एका फॅनसोबत दिसत आहे. पण या फोटोत सोनम इतकी वेगळी दिसत आहे की, तिला ओळखणे देखील कठीण जात आहे. तिने काळ्या रंगाचा टी शर्ट घातला असून केस सोडले आहेत. तसेच कॅप घातली असून भलामोठा चष्मा घातला आहे. तिच्या या लूकमुळे तिला ओळखणे देखील कठीण जात आहे. ही मुलगी खरंच सोनम आहे का असे काहीजण प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारत आहेत. 

सोनम ही बॉलिवूडमध्ये तिच्या अभिनयासोबतच फॅशन स्टेटमेंटसाठी ओळखली जाते. त्यामुळेच तिचा हा फोटो पाहून तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसत आहे. सोनमच्या या लूकची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

आज सोनमने बॉलिवूडमध्ये आपली एक जागा निर्माण केली आहे. सावरिया या चित्रपटाद्वारे तिने तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. तिने दिल्ली 6, रांजना, खुबसुरत, प्रेम रतन धन पायो, नीरजा, पॅडमॅन यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिचे लग्न गेल्यावर्षी आनंद आहुजा या व्यवसायिकासोबत झाले असून ते दोघे अनेक वर्षं नात्यात होते.

सोनम आज आघाडीची अभिनेत्री असली तरी अभिनेत्री बनण्याचे तिने कधीच ठरवले नव्हते. तिने संजय लीला भन्साळी यांच्याकडे साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली होती. ब्लॅक या चित्रपटासाठी तिने त्यांच्यासोबत काम केले होते. तिने अभिनयक्षेत्रात यावे असे संजय लीला भन्साळी यांनी तिला सुचवले होते. सुरुवातीला तिने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. पण काही महिन्यांनंतर तिने या गोष्टीसाठी होकार दिला. अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी तिने जवळजवळ 30 किलो वजन कमी केले. आज तिला चांगलेच फॅन फोलोव्हिंग असून तिच्या सौंदर्यावर तिचे फॅन्स फिदा आहेत. 

Web Title: Sonam kapoor without makeup look on airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.