sonam kapoor on nepotism debate and trolls i am here beacuse of anil kapoor and privileged | होय, मी माझ्या बाबांची मुलगी..., घराणेशाहीवरून ट्रोल करणा-यांना सोनम कपूरचे उत्तर

होय, मी माझ्या बाबांची मुलगी..., घराणेशाहीवरून ट्रोल करणा-यांना सोनम कपूरचे उत्तर

ठळक मुद्देफादर्स डेच्या निमित्ताने सोनमने पोस्ट केली आणि यानिमित्तानेच नेपोटिझमवर बोलणा-यांना उत्तर दिले.

सोनम कपूर सतत या ना त्या कारणाने ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. यावेळी घराणेशाहीच्या मुद्यावरून ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीचा वाद पुन्हा उफाळून आला आहे. करण जोहर, सलमान खान, आलिया भट यांच्यावर नेटकरी वेगवेगळे आरोप करत आहेत. स्टार्स किड्सलाही ट्रोल केले जात आहे. अनिल कपूरची लेक असल्याने सोनमही ट्रोल होतेय. आता सोनमने या ट्रोलर्सला खरमरीत उत्तर दिले आहे.
फादर्स डेच्या निमित्ताने सोनमने पोस्ट केली आणि यानिमित्तानेच नेपोटिझमवर बोलणा-यांना उत्तर दिले.


 
‘आज फादर्स डेनिमित्त मला  एक गोष्ट सांगायची आहे़  होय.. मी माझ्या बाबांची मुलगी आहे आणि मी आज ज्या ठिकाणी आहे ते माझ्या बाबांमुळे आहे. होय, मला विशेषाधिकार आहे. हा काही अपमान नाहीये, मला या सर्व गोष्टी मिळाव्यात यासाठी माझ्या बाबांनी खूप मेहनत केली. माझा जन्म कुठे व्हावा, कोणाच्या पोटी व्हावा हे माझे नशीब आहे. मला त्याचा अभिमान आहे, असे सोनम कपूरने लिहिले आहे.

 तू अनिल कपूरची मुलगी नसती तर...
तूर्तास सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.  घराणेशाहीचा वाद पुन्हा एकदा उफाटून आला असताना  सोनम कपूरने उडी घेतली होती. तिने ट्विट केले होती आणि मग काय, या ट्विटमुळे सोनम ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली होती.

‘एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्याची गर्लफ्रेंड, एक्स गर्लफ्रेंड, कुटुंबीय आणि त्याच्यासोबत काम करणा-या लोकांना दोष देणे चुकीचे आहे,’ असे ट्विट सोनमने केले होते. तिचे हे ट्विट वाचून नेटकरी भडकले होते.
  हा गर्लफ्रेंड किंवा एक्स गर्लफ्रेंडचा मुद्दा नाहीच तर बॉलिवूडमधल्या नेपोटिझमला दोष दिला जात आहे, अशा शब्दांत नेटक-यांनी सोनमला खडसावले होते. एका युजरने तर थेट सोनमच्या अभिनयक्षमतेवर बोट ठेवले होते.
‘अनिल कपूर यांची मुलगी नसतीस तर तू साफसफाईचे काम करत असतीस,' असे या युजरने लिहिले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: sonam kapoor on nepotism debate and trolls i am here beacuse of anil kapoor and privileged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.