बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरचा आगामी चित्रपट ‘द झोया फॅक्टर’चा मोशन पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आला आहे.  हा चित्रपट अनुजा चौहानच्या 'द झोया फॅक्टर' या कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपटाच्या मोशन पोस्टरवर सोनम कपूर वेगळ्याच अवतारात पहायला मिळते. या चित्रपटात सोनम सोबत दाक्षिणात्य अभिनेता दलकीर सलमान दिसणार आहे. 

द झोया फॅक्टरच्या मोशन पोस्टरमध्ये सोनम कपूर देवीच्या अवतारात दिसते आहे.

ती एका प्लॅटफॉर्मवर उभी असून तिने स्पोर्ट्स शूज परिधान केले आहेत. तिच्या एका हातात क्रिकेटची बॅट आणि दुसऱ्या हातात हेल्मेट दिसतो आहे. तिने गोल्डन बॉर्डरची निळ्या रंगाची साडी नेसली आहे. फुलांच्या माळांसोबत जड नेकलेस घातला आहे आणि चेेहऱ्यावर स्मितहास्य पहायला मिळत आहे. या पोस्टरवर लिहिलं की, इंडिया का लकी चार्म


सोनमने हे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत म्हटलं की कोणाला लिंबू मिर्चीची गरज आहे त्यांच्याकडे झोया सोलंकी आहे. इंडियाची लकी चार्म तुमचे नशीब बदलण्यासाठी आली आहे. 


‘द झोया फॅक्टर’ अनुजा चौहानच्या 'द झोया फॅक्टर' या कादंबरीवर आधारित आहे. यात एका मुलीची कथा रेखाटण्यात आली आहे जी भारताच्या क्रिकेट संघासाठी लकी मानली जाते.

या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक शर्मानं केलं आहे. फॉक्स स्टार स्टूडियोज, पूजा शेट्टी व आरती शेट्टी या चित्रपटाचे निर्माते आहेत. हा चित्रपट २० सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


Web Title: Sonam Kapoor became the country's 'Lucky Charm', the reason for knowing this
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.