बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर सध्या तिच्या सिनेमांमुळे नाहीतर पती आनंद आहूजामुळे जास्त चर्चेत असते.आनंदही  व्यवसाय जगतात एक मोठे नाव आहे. रिपोर्टनुसार आनंद आहूजाची वार्षिक कमाई 450 दशलक्ष डॉलर्स इतकी आहे, जी भारतीय चलनानुसार 3000 कोटी इतकी आहे. सोनम आणि आनंद एकत्र मिळून वर्षाला सुमारे 3085 कोटी रुपये कमवतात. ज्यामुळे दोघेही बॉलिवूडमधील एक अतिशय यशस्वी आणि श्रीमंत जोडी मानली जाते.2018 मध्ये सोनमने आनंदशी लग्न केले. लग्नानंतर माध्यमांशी बोलताना तिने सांगितले होते की,आमचे दोघांचे लग्न फक्त कुटुंबाच्या आनंदासाठी झाले आहे. आनंद आणि मी लग्नापूर्वीपासून एकमेकांना ओळखत होतो आणि एकमेकांना डेटही करत होतो.

आम्ही केवळ कुटुंबाने सांगितले म्हणून लग्नबंधनात अडकलो आहोत. आमचं नातं हे पूर्वीपासून अधिक जास्त घट्ट आहे. त्यामुळे आमच्या नात्याला लग्नाचीही  तशी गरज नव्हती. लग्नानंतर आमच्या नात्यात कोणताही बदल झालेला नाही. 

मुळात लग्नानंतरही आनंद आणि सोनम एकमेकांसोबत जास्त वेळ घालवत नाहीत. दोघेही आपल्या करियरमध्ये इतके व्यस्त असतात की दोघांनाही एकमेकांसाठी वेळच मिळत नाही. सोनमने एका मुलाखतीत सांगितले होते की, "आनंद बर्‍याचदा मुंबईत कामानिमित्त येत असतो, कामाच्या निमित्ताने बहुतेक वेळ तो मुंबईत घालवतो.

 

मी लंडन आणि दिल्लीमध्ये जास्त राहते. धावपळीच्या जगात प्रवास करणे मात्र अतिशय सोयीचे झाले आहे. त्यामुळे आम्ही नेहमीच एकमेकांना भेटण्यासाठी जिथे असू तिथे जातो. मस्त क्वॉलिटी टाईम एन्जॉय करतो आणि परत कामात व्यस्त होतो.


२०२१ या वर्षाच्या सुरुवातीला तिने नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आनंदसह एक फोटो शेअर केला होता. फोटो शेअर करत तिने आपल्या नवीन वर्षाच्या   संकल्पाविषयी सांगितले होते. मात्र या पोस्टमध्ये फोटोनेच सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. फोटोमध्ये पती आनंद आहुजाला किस करता पाहायला मिळाली होती. सोनमने यापूर्वी कधीच असा फोटो शेअर केला नव्हता. मात्र किस करतानाचा फोटो शेअर करत तिने सा-यांचेच लक्ष वेधून घेतले  होते. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sonam Kapoor and Anand Ahuja are the richest couple in B-Town, You Will Be Surprised To Know Earning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.