ठळक मुद्दे‘जन्नत’नंतर सोनलने अनेक सिनेमांत काम केले. मात्र तिला हवे ते यश मिळाले नाही. यानंतर तिने साऊथकडे आपला मोर्चा वळवला. 

‘जन्नत’ या सिनेमातून डेब्यू करणारी अभिनेत्री सोनल चौहान सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. सोनल स्वत:चे रोज नवे फोटो शेअर करते आणि क्षणात तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. तूर्तास सोनल एक वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे. होय, सोनल एकदा नाही तर दोनदा लग्न करू इच्छिते. तिची ही इच्छा ऐकून लोकांच्या भुवया उंचावल्या नसतील तर नवल. 

सोनलने अलीकडे एका ताज्या मुलाखतीत ही इच्छा बोलून दाखवली. मी निगर्सप्रेमी आहे. निसर्गावर माझे खूप प्रेम आहे. त्यामुळे मी दोनदा लग्न करू इच्छिते असे सोनल म्हणाली. आता निसर्ग आणि दोन लग्नाचा काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर आहे. होय, सोनलला एकदा समुद्र किनारी लग्न करायचेय आणि दुस-यांदा उंच पहाडावर. सोनलला लग्नाची स्वप्नं पडू लागली म्हटल्यावर तिचा मिस्टर राईट कोण असा प्रश्नही तुम्हाला पडला असेलच. तर तिने याबद्दलही स्पष्ट केले आहे. सध्या माझ्या आयुष्यात कोणीही नाही. मी अगदी सिंगल आहे, असे तिने स्पष्ट केले आहे.

सोनल चौहान एक मॉडेल, अभिनेत्री आणि पार्श्वगायिका आहे. तिने हिंदी चित्रपटाशिवाय तेलगू चित्रपटात काम केले आहे. सोनल चौहानचा जन्म 16 मे, 1985 साली न्यू दिल्लीत झाला होता. तिने दिल्ली युनिव्हर्सिटीतील गार्गी कॉलेजमधील फिलोसॉफी आॅनर्समध्ये डिग्री प्राप्त केली.

सोनल चौहानने हिमेश रेशमियाच्या अल्बममधून करिअरची सुरूवात केली. सोनल चौहानने मुकेश भटचा चित्रपट ‘जन्नत’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.सोनल चौहान सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. तिचे इंस्टाग्रामवर 3.2 मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.
‘जन्नत’नंतर सोनलने अनेक सिनेमांत काम केले. मात्र तिला हवे ते यश मिळाले नाही. यानंतर तिने साऊथकडे आपला मोर्चा वळवला. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: sonal chauhan wants two weddings one at the beach and one in the mountains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.