सोनाक्षी सिन्हाचा प्रतिकात्मक पुतळा जाळला, अभिनेत्रीने मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 11:56 AM2019-08-05T11:56:46+5:302019-08-05T11:59:08+5:30

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने पुन्हा एकदा वाद ओढवून घेतला आहे. रविवारी देशात अनेक ठिकाणी सोनाक्षीचा प्रतिकात्मक जाळण्यात आला.

sonakshi sinha say sorry after insult of valmiki society | सोनाक्षी सिन्हाचा प्रतिकात्मक पुतळा जाळला, अभिनेत्रीने मागितली माफी

सोनाक्षी सिन्हाचा प्रतिकात्मक पुतळा जाळला, अभिनेत्रीने मागितली माफी

Next
ठळक मुद्देवर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, लवकरच सोनाक्षी ‘दबंग 3’ मध्ये दिसणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने पुन्हा एकदा वाद ओढवून घेतला आहे. रविवारी देशात अनेक ठिकाणी वाल्मिकी समाजाने सोनाक्षीचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. सोनाक्षीने अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत वाल्मिकी समाजाविरोधात अपमानास्पद शब्दांचा वापर केल्याचा आरोप आहे. देशभरात याविरोधात निषेधाचे सूर उमटल्यानंतर सोनाक्षीने याप्रकरणी माफी मागितली आहे.


23 जुलै 2019 रोजी सिद्धार्थ कनन यांच्यासोबतच्या माझ्या मुलाखतीसंदर्भात मी सांगू इच्छिते की, वाल्मिकी समाजाबद्दल माझ्या मनात आदर आहे. अजाणतेपणी माझ्या तोंडून निघालेल्या शब्दांनी मी कुण्या एका व्यक्तिच्या, समाजाच्या भावना दुखावल्या असतील तर मी नम्रपणे माफी मागते. कुणाच्याही भावना दुखावण्याचा वा विशिष्ट समाजाचा अपमान करण्याचा माझा कुठलाही उद्देश नव्हता, असे ट्विट सोनाक्षीने केले आहे.
उत्तर प्रदेशातील रामपूर येथे वाल्मिकी समाजाने सोनाक्षीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
काही दिवसांपूर्वी सोनाक्षी एका फसवणुकीच्या प्रकरणात अडकली होती. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात सोनाक्षीला एका स्टेज शोमध्ये परफॉर्म करायचे होते. त्यासाठी तिने 24 लाखांची रक्कम घेतली होती मात्र सोनाक्षी या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचली नसल्याचा आरोप तिच्यावर लावण्यात आला होता. शिवाय याप्रकरणी यानंतर उत्तर प्रदेशमध्ये तिच्यावर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, लवकरच सोनाक्षी ‘दबंग 3’ मध्ये दिसणार आहे. या सिनेमात  सोनाक्षी, सलमान आणि अश्वमी मांजरेकर यांच्यात हे लव्ह ट्रँगल असल्याचे म्हटले जात आहे. नुकताच सोनाक्षीचा ‘खानदानी शफाखाना’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सेक्स कॉमेडी चित्रपटात सोनाक्षी एक सेक्स क्लिनिक चालवताना दिसतेय. प्रदर्शनापूर्वी हा सिनेमाही यातील काही सीन्समुळे वादाच्या केंद्रस्थानी होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: sonakshi sinha say sorry after insult of valmiki society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app