बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी आपलं वजन कमी करणाऱ्या लिस्टमध्ये अनेक अभिनेत्रींची नाव सामील आहेत.  बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हानाचे  नाव देखील या लिस्टमध्ये सामील आहे. तिने २०१० साली सलमान खानच्या दबंग चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सिनेइंडस्ट्रीत येण्यापूर्वी तिचे वजन चक्क ९० किलो इतके होते. हे ऐकून जरा तुम्हाला धक्का बसला असेल ना... हो, हे खरे आहे. तिने चक्क ९० किलो वजन होते आणि तिने दबंग चित्रपटासाठी तब्बल ३० किलोंनी वजन घटवले.


अमर उजालाच्या रिपोर्टनुसार, सोनाक्षीला वजनामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. रिपोर्टनुसार सोनाक्षी खेळात तरबेज होती मात्र तरीही लोक तिची खिल्ली उडवायचे. वजन जास्त असल्यामुळे तिला शाळेतील नाटकांपासून दूर ठेवणं आलं.

कॉलेजमध्ये असताना तिला फॅशन शोमध्ये रॅमवॉक करायचा होता मात्र एक बारीक मुलीने तिला सांगितलं तू लाईट्स पकडं कारण रॅमवॉक करण्यासाठी तुझं वजन खूप जास्त आहे. असे सांगून सोनाक्षीला बाजूला करण्यात आलं. मात्र निराश न होता तिने  ३० किलो वजन कमी करुन भाईजानसोबत थेट बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली. 

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर सोनाक्षी दबंग 3 मध्ये सलमानसोबत झळकणार आहे. हा सिनेमा हिंदीसोबतच कन्नड, तमीळ आणि तेलुगू भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Sonakshi sinha loose her wait before she enter into bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.