आमिर खानच्या घरापर्यंत पोहोचला कोरोना; म्हणाला, आईसाठी प्रार्थना करा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 01:07 PM2020-06-30T13:07:33+5:302020-06-30T13:08:11+5:30

आमिरने स्वत: सोशल मीडियावर दिली माहिती

some staff of actor aamir khan were found to be corona positive |  आमिर खानच्या घरापर्यंत पोहोचला कोरोना; म्हणाला, आईसाठी प्रार्थना करा

 आमिर खानच्या घरापर्यंत पोहोचला कोरोना; म्हणाला, आईसाठी प्रार्थना करा

googlenewsNext
ठळक मुद्देआमिर खान सध्या त्याच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमात बिझी आहे. 

देशात कोरोना व्हायरसचा कहर वाढत चालला आहे. रोज नवे हजारो नवे रूग्ण सापडत आहेत. बॉलिवूडचे सेलिब्रिटीही या महामारीपासून स्वत:ला वाचवू शकलेले नाहीत. आता बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याच्या घरावरही कोरोनाने हल्लाबोल केला आहे. आमिरच्या स्टाफमधील काही लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
आमिरने स्वत: सोशल मीडियावर याची माहिती दिली.

काही क्षणांपूर्वी आमिरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक नोट जारी केली. आपल्या स्टाफमधील काही लोकांना कोरोना झाल्याचे त्याने या नोटमध्ये स्पष्ट केले आहे. त्याने लिहिले, ‘माझ्या स्टाफमधील काही लोकांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. त्यांना तात्काळ क्वारंटाइन करण्यात आले आहे. या सर्वांना योग्य आरोग्य सुविधा मिळावी म्हणून बीएमसीने कमालीची तत्परता दाखवली, त्याबद्दल मी बीएमसीचे खास आभार मानतो. आम्हा उर्वरित सर्वांची टेस्ट निगेटीव्ह आली आहे. मात्र आता मी माझ्या आईला टेस्टसाठी नेत आहे, ती या साखळीतील शेवटची व्यक्ती आहे. तिची टेस्ट निगेटीव्ह येईल, यासाटी प्रार्थना करा...’



आमिर खान सध्या त्याच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमात बिझी आहे. यात त्याच्या अपोझिट करिना कपूरची वर्णी लागली आहे. आपल्या या आगामी सिनेमात आमिर कोरोना महामारीनंतर स्थिती दाखवणार असल्याची बातमी मध्यंतरी आली होती. अर्थात अद्याप याबद्दलची अधिकृत माहिती नाही.

कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतो आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 18 हजारांवर नवे रूग्ण सापडले. देशातील कोरोना रूग्णांची संख्या कधीच 5 लाखांवर पोहोचली आहे. मुंबईतही कोरोनाचा आकडा चिंता वाढवणारा आहे.

Read in English

Web Title: some staff of actor aamir khan were found to be corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.