बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमूने जानेवारी 2015मध्ये अभिनेत्री सोहा अली खानसोबत लग्न केले आणि 2017मध्ये सोहाने एका मुलीला जन्म दिला. जिचे नाव इनाया आहे. आता ती दोन वर्षांची असून समजूतदारही झाली आहे. याचा प्रत्यय नुकताच कुणाल खेमूने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोतून आला. या फोटोत इनाया सामानाची किंमत पाहताना दिसते आहे.


कुणालने इनायाचा फोटो शेअर करीत लिहिले की, कारण आम्हाला माहित आहे की आम्हाला काय आवडते आणि त्याची योग्य किंमत काय असली पाहिजे. 


इनाया भाऊ तैमूर अली खान एवढीच क्युट आहे. कित्येक वेळा त्या दोघांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

याशिवाय इनाया तिच्या ग्रे ग्रीन डोळ्यांमुळे चर्चेत असते. एका वेबसाईटशी चर्चा करताना कुणालने इनायाच्या डोळ्यांच्या रंगाबद्दल सांगितले की, सोहा आणि माझ्या डोळ्यांचा रंग डार्क आहे व माझ्या आजीच्या डोळ्याचा रंग लाइट आहे. त्यामुळे इनायाच्या डोळ्यांचा रंग तसा आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Soha Ali Khan's daughter, Kunal Khemu, shared the price before purchasing the goods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.