सोफिया हयातने घेतला सलमान खानशी पंगा, बॉलिवूडच्या या अभिनेत्याचे करिअर बर्बाद केल्याचा केला आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 01:33 PM2021-06-11T13:33:46+5:302021-06-11T13:34:35+5:30

सोफिया हयातने बॉलिवूडचा भाईजान सलमान खानवर आरोप केले आहेत.

Sofia Hayat takes on Salman Khan, accuses him of ruining Bollywood actor's career | सोफिया हयातने घेतला सलमान खानशी पंगा, बॉलिवूडच्या या अभिनेत्याचे करिअर बर्बाद केल्याचा केला आरोप

सोफिया हयातने घेतला सलमान खानशी पंगा, बॉलिवूडच्या या अभिनेत्याचे करिअर बर्बाद केल्याचा केला आरोप

Next

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानबद्दल वाईट बोलण्याची कोणाची हिंमत नाही. असे सांगितले जाते की सिनेइंडस्ट्रीत टिकून राहायचे असेल तर दबंग खानचा आदर ठेवावा लागतो त्याच्याशी पंगा घेऊन चालत नाही. मात्र कमाल आर खानने सलमान खानवर निशाणा साधत असतो. कमाल आर खानने सलमान खान विरोधात केलेले ट्विटबद्दल सर्वांनाच माहित आहे. त्या दोघांची भांडणे कोर्टापर्यंत गेली आहेत.

केआरकेनंतर आता सोफिया हयातने सलमान खानविरोधात हल्लाबोल केला आहे. सोफिया हयातने सलमान खानवर बकवास चित्रपट बनवण्यासोबत रणदीप  हुडाचे करिअर बर्बाद केल्याचा आरोप केला आहे.

सोफिया म्हणाली की, रणदीप हुडाला इंडस्ट्रीत राहायचे आहे, त्यामुळे त्याने राधेसारखा बकवास चित्रपट केला. कारण जर त्याने ही भूमिका नाकारली असती तर त्याला बॉलिवूडमधून बाहेरचा रस्ता दाखवला असता. रणदीपकडून इतकी बकवास भूमिका साकारायला लावून सलमान खानने त्याचे करिअर बर्बाद केले आहे.


इतकेच नाहीतर सोफिया हयातने सलमान खानवर आपल्या वयाच्या अर्ध्या वयाच्या मुलींसोबत काम करण्याचाही आरोप केला आहे. तिने सलमान खानला प्रश्नदेखील विचारला आङे की तो कझी आपल्या वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करायला सुरूवात करेल? तसेच तिने सलमानवर हादेखील आरोप केला की, ईद सारख्या सणाचा फायदा कमाईसाठी करतो.

सोफियानुसार, सलमान खान प्रत्येक वर्षी ईदला आपला चित्रपट रिलीज करतो. तो धार्मिक सणांचा फायदा घेतो कारण चित्रपटाची कमाई जास्त होईल. तो आपल्या चित्रपटात बकवास लाईन्स आणि जुन्या सीन्सचा वापर करतो. त्याच्या सिनेमात काहीच नाविन्य नसते. राधेचा ट्रेलर पाहिल्यानंतर माझ्या डोक्यात हाच विचार आला होता की, हे सर्व मी आधीच पाहिलेले आहे. 


सोफिया हयातने केलेल्या आरोपांवर भाईजानकडून कोणतेच प्रत्युत्तर आले नाही. मात्र त्याचे चाहते तिच्यावर चांगलेच भडकले आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sofia Hayat takes on Salman Khan, accuses him of ruining Bollywood actor's career

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app