social media funny reaction over riteish deshmukh genelia deshmukh fight on twitter | OMG! रितेश-जेनेलियातील ‘गृहक्लेश’ ऑनलाईन...; नेटिझन्स म्हणाले, ‘कहानी घर घर की’!!

OMG! रितेश-जेनेलियातील ‘गृहक्लेश’ ऑनलाईन...; नेटिझन्स म्हणाले, ‘कहानी घर घर की’!!

ठळक मुद्देजेनेलिया आणि रितेशच्या प्रेमप्रकरणाला तुझे मेरी कसम या चित्रपटाच्या चित्रीकरणापासूनच सुरुवात झाली.

 रितेश देशमुखजेनेलिया डिसूजा म्हणजे बॉलिवूडचे क्यूट कपल.  2012 मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली. खरे तर रितेश व जेनेलिया एकमेकांवरचे प्रेम, एकमेकांबद्दलचा आदर व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाही. पण रविवारी दोघांमधील ‘भांडण’ चव्हाट्यावर आले. होय, रविवारी रितेशने एक फोटो ट्वीट केला. विशेष म्हणजे, यात त्याने जेनेलियालाही टॅग केले.


‘प्रत्येक रूसलेल्या स्त्रीमागे एक पुरूष असतो. पण त्याची काय चूक झाली, हे त्या बिचा-याला ठाऊक नसते,’असे रितेशने शेअर केलेल्या या फोटोवर लिहिले होते.  
आता रितेशने हा फोटो पोस्ट केल्यावर जेनेलिया शांत थोडीच बसायची. तिनेही रितेशला टॅग करत, एक फोटो शेअर केला. ‘मी खरे तर नव-याच्या गोष्टींकडे लक्षच देत नाही. पण जेव्हा केव्हा देते, तेव्हा तो चुकीचाच असतो,’ असे या फोटोवर लिहिलेले होते.
रितेश व जेनेलिया या दोघांनी एकमेकांना टॅग करत केलेल्या या ट्वीटने चाहत्यांना आयती संधी मिळाली. मग काय, दोघांचेही हे ट्वीट काही क्षणात सोशल मीडियावर व्हायरल झाले. नेटझन्सनी यावर धम्माल कमेंट्स दिल्यात.
‘गृहक्लेश ऑनलाईन झाला,’ असे एका युजरने लिहिले. तर अन्य एका युजरने ‘घर घर की कहानी’ अशी प्रतिक्रिया दिली. एका युजरने ‘रितेश भैय्या, वो स्त्री है कुछ भी कर सकती है,’ अशी मजेशीर कमेंट दिली. 
आता रितेश व जेनेलियाने हे ट्वीट का केले? जेनेलिया रितेशवर खरोखर रागावली की आणखी काही? हे आम्हाला ठाऊक नाही. पण या ट्वीटने लोकांचे चांगलेच मनोरंजन केले, इतके मात्र नक्की...

जेनेलिया आणि रितेशच्या प्रेमप्रकरणाला तुझे मेरी कसम या चित्रपटाच्या चित्रीकरणापासूनच सुरुवात झाली. या चित्रपटाचे चित्रीकरण हैद्राबादमध्ये सुरू असल्याने या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी त्यांनी एकमेकांसोबत खूप वेळ घालवला होता. चित्रीकरण संपल्यावर मुंबईत परतल्यावर ते दोघे एकमेकांना मिस करू लागले. एकमेकांना भेटण्याची ते संधीच शोधत असत. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात कधी पडले हे त्या दोघांना देखील कळले नव्हते.

रितेश व जेनेलियाच्या ट्वीटवर नेटिझन्सच्या मजेशीर प्रतिक्रिया...पाहाच...


 

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: social media funny reaction over riteish deshmukh genelia deshmukh fight on twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.