So, even after the breakup, is Sushant Singh Rajput in contact with Rajput Ankita Lokhande? | ​तर काय ब्रेकअपनंतरही सुशांत सिंग राजपूतच्या संपर्कात आहे अंकिता लोखंडे?

​तर काय ब्रेकअपनंतरही सुशांत सिंग राजपूतच्या संपर्कात आहे अंकिता लोखंडे?

सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांचा ‘पवित्र रिश्ता’ तुटला तेव्हा, अनेकांना धक्का बसला होता. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या सेटवर सुशांत व अंकिता एकत्र आले होते. हळूहळू दोघांचे प्रेम बहरले आणि मग हे लव्हबर्ड्स जगाची पर्वा न करता एकत्र हिंडू-फिरू लागले. इतके की दोघांचे एकमेकांशिवाय पानही हलेना. सुशांत व अंकिता अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. पण अचानक काही तरी बिनसले आणि हे नाते ब्रेकअपपर्यंत पोहोचले.  सुशांत व अंकिताच्या बे्रकअपची बातमी चाहत्यांसाठीच नाही सगळ्या टीव्ही इंडस्ट्रीसाठीही धक्कादायक होती. या ब्रेकअपनंतर अंकिता डिप्रेशनमध्ये गेल्याच्याही बातम्या आल्या. तिला सावरायला बराच वेळ लागला. पण ती सगळ्यांतून सावरली. लवकरच अंकिता ‘मणिकर्णिका : द क्वीन न आॅफ झांसी’ या चित्रपटात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.  यात ती झलकारी बाईंची भूमिका साकारणार आहे.अलीकडे एका मुलाखतीत अंकिताला सुशांतबद्दल छेडले गेले. आजही तू सुशांतच्या संपर्कात आहेस का? असा थेट प्रश्न अंकिताला विचारण्यात आला. पण अंकिताने याचे थेट उत्तर देणे टाळले. मी कधीच माझे जुने नाते लपवले नाही. मी त्या नात्यात होते तेव्हाही आपल्या खासगी आयुष्याबद्दल कधीच बोलत नव्हते. आताही मला माझ्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे नाही. माझ्या कामाबद्दल तुम्ही बोलणार असाल तर मी तासन तास बोलायला तयार आहे. पण खासगी आयुष्याबद्दल बोलायला मला वेळ नाही,असे अंकिता म्हणाली.

ALSO READ : OMG!! अंकिता लोखंडे म्हणते, मीच ‘मणिकर्णिका’ची हिरोईन!

अंकिताच्या या उत्तरावरून एक तर स्पष्ट आहे की, अद्यापही जखम पूर्णपणे भरलेली नाही. पण अंकिताला आता अजिबात मागे वळून पाहायचे नाही.  यापूर्वी सुशांतबद्दल विचारल्यावर अंकिता अशीच बिथरली होती. लोक मला सुशांतची एक्स म्हणून का ओळखतात, हेच मला कळत नाही. माझी स्वत:चीही ओळख आहे. माझ्या कामाबद्दल बोलणे सोडून लोकांना माझ्या खासगी आयुष्यात इतका इंटरेस्ट का? असा सवाल तिने केला होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: So, even after the breakup, is Sushant Singh Rajput in contact with Rajput Ankita Lokhande?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.