ठळक मुद्देआज तब्बूचा वाढदिवस असून तिच्या बहिणीने हटक्या अंदाजात तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. फराहने तिचा आणि तब्बूचा लहानपणीचा एक फोटो पोस्ट करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

तब्बू गेली अनेक वर्षं बॉलिवूडमध्ये काम करत असून तिने एक बालकलाकार म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली आहे. तिची मोठी बहीण फराह नाझ देखील अभिनेत्री असून तब्बू लहान असताना अनेकवेळा बहिणीसोबत चित्रपटाच्या सेटवर येत असे. तब्बूने बालकलाकार म्हणून काम केल्यानंतर कुली नं. १ या तेलगु चित्रपटाद्वारे एक नायिका म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर पहला पहला प्यार या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये एंट्री केली. तिचा हा चित्रपट फ्लॉप झाला. पण विजयपथ या चित्रपटामुळे तिच्या करियरला कलाटणी मिळाली. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतरचे तिचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले. पण हकीगत या चित्रपटामुळे तिला पुन्हा यश मिळाले. 

आज तब्बूचा वाढदिवस असून तिच्या बहिणीने हटक्या अंदाजात तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. फराहने तिचा आणि तब्बूचा लहानपणीचा एक फोटो पोस्ट करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोत फराह आणि तब्बू दोघीही अतिशय सुंदर दिसत आहेत. 

आज तब्बूला बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक मानले जाते. तब्बूचा दे दे प्यार दे हा चित्रपट काहीच महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. तब्बूला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून तिचे फॅन्स तिला सोशल मीडियावर नेहमीच फॉलो करतात. तिने तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत तब्बूचा ग्लॅमरस अंदाज तिच्या चाहत्यांना पाहायला मिळत असून या अंदाजावर तिचे चाहते फिदा झाले आहेत.

अभिनेत्री तब्बूची मोठी बहीण फराह आज बॉलिवूडमध्ये कुठेही नाही. पण याच फराहच्या सौंदर्याने एकेकाळी चाहत्यांना वेड लावले होते. 80 व 90 च्या दशकात फराहने अनेक सुपरस्टार्ससोबत काम केले. राजेश खन्ना, ऋषी कपूर, संजय दत्त, गोविंदा, जॅकी श्रॉफ, मिथुन अशा अनेक अभिनेत्यांसोबत ती झळकली. अनेक हिट चित्रपट तिच्या नावावर आहेत. पण अचानक फराहने बॉलिवूडला अलविदा म्हटले. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sister Farha Naaz says happy birthday to Tabu with cute throwback picture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.