Sidharth Malhotra Bike Slips And He Meets With An Accident During Shershaah Kargil Schedule | अपघातातून थोडक्यात बचावला सिद्धार्थ मल्होत्रा, हातापायाला झाली दुखापत
अपघातातून थोडक्यात बचावला सिद्धार्थ मल्होत्रा, हातापायाला झाली दुखापत

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा नुकताच अपघातातून थोडक्यात बचावला आहे. डोंगराळ भागात मोटर सायकल चालवत असताना त्याचा अपघात झाला. सुदैवानं मोठी हानी टळली. त्याच्या हाता व पायाला दुखापत झाली आहे. अपघात झाल्यानंतर लगेच त्याला आर्मी रुग्णालयात नेण्यात आलं आणि मलमपट्टी करण्यात आली. 

सूत्रांच्या माहितीनुसार, शूटनंतर सिद्धार्थ व त्याचा सहकलाकार शिव पंडित राइडसाठी गेले होते. यादरम्यान शिवचा बॅलन्स गेला आणि त्याची बाईक स्लिप झाली. सिद्धार्थ शिवच्या मागे गाडी चालवत होता. शिवची बाईक स्लीप झाल्यामुळे सिद्धार्थने अचानक ब्रेक मारला आणि त्याची बाईक घसरली व त्याचा अपघात झाला. अपघातानंतर दुखापतीचे फोटो समोर आले आहेत. त्यात सिद्धार्थच्या हात व पायाला पट्टी बांधलेली दिसते आहे. या घटनेनंतर त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याचे चाहते लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना करत आहे. 


सिद्धार्थ मल्होत्रा सध्या शेरशाह चित्रपटाचं शूटिंग करतो आहे. विक्रम बत्रा हे भारतीय जवानांच्या दलाचे कॅप्टन होते आणि ते कारगील सीमेवर तैनात होते. १९९९ साली कारगील युद्धात विक्रम बत्रा शहीद झाले होते. त्यांचे युद्ध कौशल्य व शूरता पाहून त्यांच्यासोबतच्या इतर जवान आणि अधिकाऱ्यांनी त्यांना शेरशाह ही पदवी दिली होती.

या चित्रपटात विक्रम बत्रा यांची भूमिका सिद्धार्थ मल्होत्रा साकारतो आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन विष्णु वर्धन करत आहेत.

Web Title: Sidharth Malhotra Bike Slips And He Meets With An Accident During Shershaah Kargil Schedule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.