Sidharth malhotra alia bhatt in aashiqui 3 mohit suri film gda | ब्रेकअपनंतर आलिया भट पुन्हा करणार एक्ससोबत रोमान्स

ब्रेकअपनंतर आलिया भट पुन्हा करणार एक्ससोबत रोमान्स

सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट यांनी 2012 साली करण जोहरच्या 'स्टुडेंट ऑफ द इअर' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. दोघांची केमिस्ट्री ही लोकांना खूप भावली होती. त्यानंतर आलिया आणि सिद्धार्थच्या अफेअरची चर्चा सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. पण हे नातं फार काळ टिकलं नाही. काही दिवसांतच हे नातं सपुष्टांत आले. 


फिल्मीबिटच्या रिपोर्टनुसार आशिकी 3 मध्ये आलिया आणि सिद्धार्थ पुन्हा एकदा रोमान्स करताना दिसणार आहेत. मोहित सूरी हा सिनेमा बनवणार आहे त्यासाठी तयारीदेखील सुरु झाली आहे. सिनेमाची स्क्रिप्ट आणि अन्य गोष्टींची तयारी झाली आहे.  आशिकी 2 मध्ये श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूरची जोडी दिसली होती. मोहित सूरी आणि सिद्धार्थ खूप चांगले मित्र आहेत. सिनेमाची स्टारकास्ट अद्याप फायनल झालेली नाही. पण सिद्धार्थ आणि आलियाचे फॅन्स त्यांना एकत्र बघण्यासाठी नक्कीत उत्सुक आहे.  


आलिया दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांचा 'आरआरआर' या आगामी सिनेमात दिसणार आहे. या चित्रपटात आलिया भट आणि अजय देवगण यांच्यासोबत राम चरण आणि जूनियर एनटीआर प्रमुख भूमिकेत आहेत. आरआरआर" देशभरात १० भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 


 

Web Title: Sidharth malhotra alia bhatt in aashiqui 3 mohit suri film gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.