siddharth pithani shares messages sent by sushant singh rajput brother-in-law for him | माझ्या बायकोला या सगळ्यांपासून दूर ठेव...! सुशांतच्या जीजूने केलेले ‘ते’ व्हाट्सअ‍ॅप मॅसेज झालेत व्हायरल

माझ्या बायकोला या सगळ्यांपासून दूर ठेव...! सुशांतच्या जीजूने केलेले ‘ते’ व्हाट्सअ‍ॅप मॅसेज झालेत व्हायरल

ठळक मुद्देतूर्तास या मेसेजचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावरदेखील व्हायरल होत आहेत.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या का केली, हा प्रश्न अनुत्तरीत असला तरी रोज नवे खुलासे मात्र होत आहेत. आता सुशांतचा मित्र  सिद्धार्थ पिटाणी याने वेगळाच खुलासा केला आहे. होय, सिद्धार्थने सुशांतचे जीजू ओ.पी. सिंग यांच्या   वॉट्सअ‍ॅप मेसेजचे स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. या मॅसेजमध्ये ओ.पी. सिंह यांनी सुशांतला त्यांच्या पत्नीपासून (सुशांतची बहीण) दूर राहण्याचा सल्ला दिला होता.

सुशांतचे कुटुंबीय त्याचे मित्र, त्याच्या अलीकडच्या काही वागण्यामुळे नाराज होते, असा अर्थ या मॅसेजमधून काढला जातो आहे. सुशांतच्या जीजूने हे सगळे मॅसेज सुशांतला नाही तर सिद्धार्थला केले होते. यानंतर सिद्धार्थने हे मॅसेज सिद्धार्थला फॉरवर्ड केले होते. इंडिया टुडेने याबाबतचे वृत्त दिले आहे.  हे सगळे मॅसेज सिद्धार्थने मुंबई पोलिसांनाही सोपवले आहेत.

असे आहेत मॅसेज...

‘मी चंदिगडला पोहोचलो. मुंबईत बोलावल्याबद्दल आभार. त्यामुळे मला माझ्या जुन्या मित्रांना भेटण्याची संधी मिळाली. तुझ्यावर  तुझे आयुष्य, करिअर आणि घराची जबाबदारी नाही. मी योग्य अंदाज लावला आणि त्यानुसार, माझ्या प्रवासाचे नियोजन केले,’ असे पहिल्या मॅसेजमध्ये सुशांतच्या जीजूने लिहिले आहे.
आपल्या दुस-या मॅसेजमध्ये ते लिहितात, ‘कृपया माझ्या पत्नीला तुझ्या समस्यांपासून दूरच ठेव. कारण तुझा मित्रपरिवार, तुझ्या वाईट सवयी आणि मिसमॅनेजमेंटचा तिला त्रास होईल. तशी मी पूर्ण काळजी घेईल की, तिला याचा काहीही त्रास होणार नाही. करण ती खूप चांगली आहे.’
तिस-या मॅसेजमध्ये लिहिले आहे की, ‘मी एकटी व्यक्ती आहे जी तुझी मदत करू शकते. मी अजूनही तुझ्या मदतीसाठी तयार आहे. जे कुणी तुझी देखभाल करत आहेत ते तुझी गर्लफ्रेन्ड, तिचे कुटुंब, तुझा मॅनेजर त्यांना सांग, मी मदत करेन.’
तूर्तास या मेसेजचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावरदेखील व्हायरल होत आहेत. या व्हायरल होणा-या मेसेजमुळे सुशांत मृत्यू प्रकरणाला आता वेगळी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: siddharth pithani shares messages sent by sushant singh rajput brother-in-law for him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.