Siddharth Malhotra says that because of this I have survived in Bollywood | सिद्धार्थ मल्होत्रा म्हणतो, या कारणामुळे मी बॉलिवूडमध्ये टिकून राहिलो
सिद्धार्थ मल्होत्रा म्हणतो, या कारणामुळे मी बॉलिवूडमध्ये टिकून राहिलो
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राला इंडस्ट्रित येईन पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. येणाऱ्या आठवड्यात त्याचा अय्यारी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. यात त्याच्यासोबत मनोज बायपेयी  पूजा चोप्रा, स्कुलप्रीत, अनुपम खेर आणि नसीरुद्धीन शाह यांच्या मुख्य भूमिका आहे. आपल्या अवघ्या पाच वर्षांच्या करिअरमध्ये सिद्धार्थने विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत.   

आपल्या करिअरबाबत बोलताना सिद्धार्थ म्हणाला की, एक अभिनेता म्हणून मी कधीही पूर्णपणे आनंदी किंवा समाधानी होऊ शकत नाही.  यामागचे कारण म्हणजे प्रत्येक शुक्रवारी तुमचे नशिब बदलत असते. या चढ-उतारामधून खूप काही शिकायला मिळते. जे मला पुढच्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तूर्तास मी एक गोष्टीला घेऊऩ खूश आहे की मी विविध प्रकारच्या भूमिका साकारतो आहे. त्यातल्या भले ही काही फ्लॉप तर काही हिट  गेल्या असतील मात्र यातून मी खूप काही शिकलो. मी नेहमीच माझ्या मनाचा आवाज ऐकून काही हटके भूमिका करण्याचा प्रयत्न केला आहे. 

त्याच्या येणाऱ्या अय्यारी चित्रपटात ही तो लष्करी अधिका-याच्या भूमिकेत दिसणार आहे. या थ्रीलर चित्रपटात आहे. ‘अय्यारी’या अ‍ॅक्शनपटात सिद्धार्थ एकदम वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे.16 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या समिक्षा समितीने संरक्षण मंत्रालयाच्या अधिका-यांनी ‘अय्यारी’ चित्रपट पाहिल्यानंतर काही बदल सुचवले होते. आधी हा चित्रपट 9 फेब्रुवारीला रिलीज होणार होता मात्र सेन्सॉर बोर्ड कडून सर्टिफिकेट न मिळाल्यामुळे चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती.  

सिद्धार्थचे यापूर्वी आलेले सिद्धार्थचे तिन्ही चित्रपट धडाधड आपटले होते. ‘बार बार देखो’, ‘ए जेंटलमॅन’, ‘इत्तेफाक’ हे सिद्धार्थचे तिन्ही चित्रपट बॉक्सआॅफिसवर कुठलीच कमाल दाखवू शकले नाहीत. त्यामुळे सिद्धार्थला ‘अय्यारी’कडून विशेष अपेक्षा आहेत. Web Title: Siddharth Malhotra says that because of this I have survived in Bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.