प्रसिद्ध खलनायक आणि क्राईम मास्टर गो गो या नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेते शक्ती कपूर यांचा मुलगा सिद्धांत कपूरला मराठी चित्रपटात काम करायचं आहे. मात्र मराठीतील विनोदी कथेवर बेतलेला चित्रपट असावा असे सिद्धांत म्हणतोय. लहान पणापासूनच मी दादा कोंडके यांचा खूप मोठा चाहता आहे. त्यांचे सर्व चित्रपट मी पहिले असून ते मला प्रंचड आवडतात. तसेच त्यांच्या विनोदाचे टायमिंग खूपच परफेक्ट होते. त्यामुळे भविष्यात मला मराठी चित्रपटात काम करायचं आहे असे सिद्धांत कपूर सांगत होता. 

सिद्धांतचा आगामी चित्रपट ‘यारम’च्या प्रेस कॉन्फरंसदरम्यान त्याने पत्रकारांशी मराठीतून गप्पा मारल्या. त्यावेळी तो म्हणाला, मी मराठी आहे. माझी आई महाराष्ट्रीय व वडील पंजाबी आहेत. मात्र घरात वातावरण मराठमोळंच वातावरण असतं. मी माझी बहिण श्रद्धा कपूर आणि आई घरात मराठीतूनच एकमेकांशी संवाद साधत असतो.     


यारम हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत असून मैत्रीवरती आधारित असलेल्या या चित्रपटात प्रेमाचा चौकोन आपल्याला पहायला मिळणार आहे.

 ‘यारम' या चित्रपटात सिद्धांत कपूर, प्रतीक बब्बर, प्यार का पंचनामा फेम इशिता राज शर्मा, इशकबाज फेम सुभा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘चित्रपटाचे दिग्दर्शक ओवैस खान यांनी सांगितले.


 ही कथा अशी आहे की सिद्धांत कपूरने साकारलेल्या साहिल कुरेशीशी आधीच लग्न केले आहे.  या चित्रपटात साहिलने ट्रिपल तलाकद्वारे पत्नी जोयाशी घटस्फोट घेतला आहे. त्यांनतर घडणाऱ्या घडामोडी ही या चित्रपटाची मुख्य कहाणी आहे.

 तिहेरी तलाक कायद्यात नुकत्याच झालेल्या बदलांवरही या चित्रपटात थेट भाष्य केले आहे. 

 


Web Title: Siddhant Kapoor wants to work in marathi film
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.