Shriya Pilgaonkar's 'crackdown' came to the meeting, it looked strange | श्रिया पिळगावकरची 'क्रॅकडाउन' आली भेटीला, दिसली हटके अंदाजात

श्रिया पिळगावकरची 'क्रॅकडाउन' आली भेटीला, दिसली हटके अंदाजात

अभिनेत्री श्रिया पिळगावकरने कमी कालावधीत हिंदी चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण केले आहे. आता ती लवकरच हाथी मेरे साथी चित्रपटात झळकणार आहे. त्यासोबतच नुकतीच तिची नवीन वेबसीरिज क्रॅकडाउन रिलीज झाली आहे. या सीरिजमधून बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अपूर्व लाखिया डिजिटल विश्वात पदार्पण करत आहेत.क्रॅकडाउन ही हेरगिरीची थरारक मालिका आहे. ही ८ भागांची मालिका वूट सिलेक्ट पहायला मिळणार आहे.


क्रॅकडाउनबद्दल श्रिया पिळगावकर म्हणाली, "हा माझा वूट सिलेक्टसोबत दुसरा शो आहे आणि या टीमसोबत पुन्हा काम करता आले याचा मला आनंद आहे. द गॉन गेम हा उत्तम अनुभव होता आणि त्याला मिळालेल्या प्रतिसादामुळे तर मी अजून थक्क आहे. आता मी क्रॅकडाउन शोबद्दल उत्सुक आहे. मी प्रथमच अॅक्शन करत आहे आणि ही व्यक्तिरेखा पूर्णपणे वेगळी आहे. 


ती पुढे म्हणाली की, दिग्दर्शक अपूर्व लाखिया यांच्यासोबत काम करणे तर निखळ आनंददायी अनुभव आहे तसेच यातून खूप शिकण्याचा अनुभवही मिळाला. द गॉन गेमसाठी मी घरातून शूटिंग करत होते, सगळे काही स्वत: करत होते. या मालिकेत बरोबर उलटे होते. खरीखुरी लोकेशन्स, भव्य सेट्स, उत्तम कलावंत आणि अर्थातच अॅक्शन दृश्ये करणे. प्रेक्षक कधी एकदा ही मालिका बघत आहेत असे मला झाले आहे. या मालिकेत काम करताना खूपच मजा आली.  प्रेक्षकांनाही ती बघताना खूप मजा येईल, अशी आशा मला वाटते."


क्रॅकडाउनमध्ये अफलातून कलावंतांची फौज आहे. यांमध्ये साकिब सलीम, इक्बाल खान, श्रिया पिळगावकर, वालुस्का डीसुझा, राजेश तेलंग आणि अंकुर भाटिया यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shriya Pilgaonkar's 'crackdown' came to the meeting, it looked strange

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.