बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे याने तुमच्या नावाचा वापर तुमची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे अशा गोष्टींपासून सतर्क रहा, असे आवाहन आपल्या चाहत्यांना केलं आहे. 


 श्रेयसची पत्नी दीप्तीच्या नावाचा वापर करून फ्रॉड केल्याचं उघडकीस आलं आहे. सोशल मीडियावर त्याची पत्नी दीप्तीच्या नावाचा वापर करून अॅमेझॉन कास्टिंग हेडच्या रुपात लोकांची फसवणूक करण्यात आली आहे. श्रेयसनं सांगितलं की, कोणीतरी त्याच्या पत्नीच्या नावाचा वापर करून सोशल मीडियावर लोकांची फसवणूक करत आहे. 


श्रेयसने सांगितलं की, या घटनेबद्दल लोकांना माहित असलं पाहिजं. दीप्ती एक स्वतंत्र निर्माती आहे आणि तिने काही चांगल्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. पण ती अॅमेजॉनची कास्टिंग डिरेक्टर नाही. मी आशा करतो की या फसवणूक करणाऱ्या व्यक्तीमुळे तुम्ही फसू नका. श्रेयसची पत्नी दीप्तीच्या नावाचा वापर करून लोकांना मुर्ख बनवलं जात आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार,या या फ्रॉड व्यक्तीनं सोशल मीडियावर स्वतःला दीप्ती सांगितलं आणि लोकांकडून त्यांचे प्रोफाईल मागत आहे. 


श्रेयस तळपदे याने बॉलिवूडमध्ये आपल्या करियरची सुरूवात इकबाल व डोर सारख्या चित्रपटात काम केले आहे. 

Web Title: Shreyas Talpade warns fans about wife''s impersonator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.