Shreya Ghoshal will decorate the museum of Madam Tussauds !! | मॅडम तुसाद संग्रहालयाची शोभा वाढविणार श्रेया घोषाल!!

मॅडम तुसाद संग्रहालयाची शोभा वाढविणार श्रेया घोषाल!!

भारतातील पहिले संग्रहालय ‘मॅडम तुसाद’मध्ये गायिका श्रेया घोषाल हिचा मेणाचा पुतळा बसविण्यात येणार आहे. या पुतळ्याचे अनावरण जून महिन्यात केले जाणार असून, यामुळे श्रेया भलतीच खूश असल्याचे बघावयास मिळत आहे. याविषयी बोलताना श्रेयाने सांगितले की, मी ‘मॅडम तुसाद’मध्ये इतिहासाचा भाग बनण्यास उत्सुक आहे. कलाकार, इतिहासकार यांच्यासह प्रसिद्ध व्यक्तींमध्ये माझा पुतळा असणे माझ्यासाठी सन्मानाची बाब असल्याचे श्रेयाने सांगितले.
 
श्रेयाचा मेणाचा पुतळा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, महानायक अमिताभ बच्चन आणि अमेरिकी पॉप स्टार लेडी गागा यांच्यासोबत ठेवला जाणार आहे. ‘तेरी मेरी प्रेम कहानी’, ‘डोला रे डोला’, ‘दिवानी मस्तानी’, ‘अगर तुम मिल जाओ’, ‘सुन रहा है न’, ‘सांस’ आणि ‘पिया ओ रे पिया’ यासारखे हिट गाणी देणाºया श्रेयाने म्हटले की, ‘चिरकाळ अमर राहणे खरोखरच सन्मानजनक आहे. यासाठी मी ‘मॅडम तुसाद’चे मनापासून आभार मानते. 

दिल्ली येथील मॅडम तुसाद संग्रहालय सर्वसामान्य जनतेसाठी येत्या जून महिन्यापासून खुले केले जाणार आहे. संग्रहालयात इतिहास, खेळ, संगीत, सिनेमा, टीव्ही अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतील प्रसिद्ध ५० लोकांचे मेणाचे पुतळे बसविण्यात आले आहे. मर्लिन एंटरटेनमेंट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे महाप्रबंधक अंशुल जैन यांनी सांगितले की, याठिकाणी श्रेयाचा पुतळा बसविण्यात येत असल्याने आम्ही आनंदी आहोत. ती तरुण पिढीची सर्वाधिक लोकप्रिय गायिका आहे. 

मॅडम तुसाद संग्रहालयाच्या जगभरात २३ शाखा उघडल्या जाणार असून, त्यात जगभरातील प्रसिद्ध लोकांचे पुतळे बसविण्यात येणार आहेत. दरम्यान, या संग्रहालयामुळे भारतात जगभरातील प्रसिद्ध व्यक्तींना स्थान दिले जाणार आहे. दरम्यान या संग्रहालयात स्थान मिळवलेली श्रेया पहिलीच गायिका ठरली आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shreya Ghoshal will decorate the museum of Madam Tussauds !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.