ठळक मुद्देश्रद्धाने मयांक आनंदसोबत लग्न केले आहे.

बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर आपल्या संसारात आनंदी आहेत. बिपाशासोबतचे करणचे तिसरे लग्न. त्याआधी अभिनेत्री श्रद्धा निगमसोबत करणने पहिले लग्न केले आणि जेनिफर विंगेटसोबत दुसरे लग्न. तिस-यांदा त्याने बिपाशासोबत लग्न गाठ बांधली. आज हे सगळे सांगायचे कारण म्हणजे, आज करणची पहिली पत्नी श्रद्धा निगम हिचा वाढदिवस. आज श्रद्धा 40 वर्षांची झाली.

श्रद्धाने मध्यप्रदेशातील इंदोर येथून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. यानंतर पुण्यात फॅशन डिझाईनिंगचा कोर्स केला. ‘चूडियां’ या मालिकेद्वारे तिने टीव्ही इंडस्ट्रीत पाऊल ठेवले. यानंतर मानो या ना मानो, कहानी घर घर की, कृष्णा अर्जुन अशा अनेक मालिकेत ती दिसली. 2008 मध्ये तिने करणसोबत लग्न केले. पण हे लग्न उणेपुरे वर्षभर टिकले. वर्षभरातच दोघांचा घटस्फोट झाला.

चर्चा खरी मानाल तर  करणने श्रद्धाचा विश्वासघात केला होता. तिने त्याला अनेकदा रंगेहात पकडले. करणचे ‘झलक दिखला जा’ची कोरिओग्राफर निकोलसोबत अफेअर असल्याच्या चर्चा त्यावेळी होत्या. 10 महिन्यांच्या लग्नात करण कधीच श्रद्धासोबत प्रामाणिक नव्हता. त्यामुळे श्रद्धाने करणपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आश्चर्य म्हणजे, श्रद्धाशी घटस्फोट घेतल्यानंतर करणने निकोल नाही तर जेनिफर विंगेटशी लग्न केले.

करणने घटस्फोट दिल्यानंतर श्रद्धाला चांगलाच मानसिक धक्का बसला होता. कारण करण आणि श्रद्धा हे पती-पत्नी असण्याच्या आधी ते एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. श्रद्धाने करणसोबत लग्न केल्यानंतर इंडस्ट्री देखील सोडली होती. सध्या ती अभिनय क्षेत्रापासून दूर असून आपले खाजगी आयुष्य एन्जॉय करत आहे. 

श्रद्धाने मयांक आनंदसोबत लग्न केले आहे. मयांक हा अभिनेता असून ‘दिल मिल गये’ या मालिकेत त्याने डॉ. राहुल ही भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे ‘दिल मिल गये’ या मालिकेत करण सिंग ग्रोव्हर मुख्य भूमिकेत दिसला होता. या मालिकेत करण आणि राहुल हे एकमेकांचे बेस्ट फ्रेंड्स असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते. 

Web Title: shraddha nigam ex-wife of karan singh grover here some unknown facts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.