ठळक मुद्देया लूकमध्ये देखील ती खूपच सुंदर दिसत होती. तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून ती मेकअपशिवाय देखील तितकीच सुंदर दिसते असे तिच्या फॅन्सचे म्हणणे आहे. 

काही अभिनेत्री मेकअप शिवाय खूपच वेगळ्या दिसतात. काही अभिनेत्रींना तर मेकअप शिवाय ओळखणे देखील कठीण जाते तर काही अभिनेत्री केवळ मेकअपमुळे सुंदर दिसतात असे म्हटले जाते. पण या सगळ्या गोष्टीसाठी श्रद्धा कपूर हा अपवाद आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठणार नाही. कारण श्रद्धा मेकअपशिवाय देखील अतिशय सुंदर दिसते. श्रद्धा कपूरचा विनामेकअपमधील हा फोटो पाहून तुम्ही नक्कीच तिच्या प्रेमात पडाल यात काहीच शंका नाही. 

श्रद्धाला नुकतेच मुंबई विमानतळावर पाहाण्यात आले. त्यावेळी तिने अजिबात मेकअप केलेला नव्हता. पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट, काळ्या रंगाची ट्राऊजर आणि डोळ्यावर चष्मा अशा साध्या लूकमध्ये तिला पाहायला मिळाले. पण या लूकमध्ये देखील ती खूपच सुंदर दिसत होती. तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून ती मेकअपशिवाय देखील तितकीच सुंदर दिसते असे तिच्या फॅन्सचे म्हणणे आहे. 

शक्ती कपूरच्या पावलावर पाऊल ठेवून त्याची मुलगी श्रद्धा कपूरने देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. श्रद्धा कपूरने खूपच कमी वेळात एक अभिनेत्री, गायिका, गीतकार आणि डिझायनर म्हणून स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'आशिकी 2', 'एक व्हिलन', 'एबीसीडी 2', 'बागी', 'रॉक ऑन 2' 'स्त्री' अशा तिच्या विविध सिनेमातील भूमिका रसिकांना भावल्या आहेत. आजच्या पिढीची नायिका म्हणून श्रद्धाने तरुणाईच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. श्रद्धाच्या सगळ्या चित्रपटांना प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

श्रद्धा आता बागी 3 या चित्रपटात टायगर श्रॉफ सोबत झळकणार आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेची चांगलीच उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागली आहे. 


Web Title: Shraddha Kapoor's no makeup look in public proves she's a natural beauty
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.