ठळक मुद्देश्रद्धाने सांगितले होते की, मी बार्गेनिंग करण्यात एक्सपर्ट आहे. मी अभिनेत्री बनण्याआधी चोर बाजारमध्ये जाऊन खूप सारी शॉपिंग करायचे. 

श्रद्धा कपूरने अभिनेत्री, गायिका, गीतकार आणि डिझायनर म्हणून स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'आशिकी 2','एक व्हिलन', 'एबीसीडी 2', 'बागी', 'रॉक ऑन 2' 'स्त्री' अशा तिच्या विविध सिनेमातील भूमिका रसिकांना भावल्या आहेत. आजच्या पिढीची नायिका म्हणून श्रद्धाने तरुणाईच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. श्रद्धा कपूर अभिनेता शक्ती कपूर आणि शिवांगी कपूर यांची मुलगी असली तरी त्यांनी एका सामान्य मुलीप्रमाणेच तिचे पालनपोषण केले आहे.

श्रद्धाचा साहो आणि छिछोरे हे दोन चित्रपट नुकतेच प्रदर्शित झाले असून या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. तिने काही महिन्यांपूर्वी नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत एक स्टार बनल्याने तिच्या आयुष्यात काय काय बदल झाले असे विचारण्यात आले होते. त्यावर तिने सांगितले होते की, एक सामान्य व्यक्ती म्हणून जगताना मी ज्या गोष्टी करत होती, त्या गोष्टी मला आता करता येत नाहीयेत. मला रिक्षाने फिरायला, रस्त्यावरून चालायला, बार्गेनिंग करायला खूप आवडते. पण एक स्टार झाल्यानंतर मला या गोष्टी करता येत नाहीयेत. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण मी बार्गेनिंग करण्यात एक्सपर्ट आहे. मी अभिनेत्री बनण्याआधी चोर बाजारमध्ये जाऊन खूप सारी शॉपिंग करायचे. 

श्रद्धा कपूर लवकरच तिचा प्रियकर रोहन श्रेष्ठासोबत लग्न करणार असल्याचे म्हटले जाते. श्रद्धा आणि रोहन दोघेही सुमारे वर्षभरापासून एकमेकांना डेट करत आहेत. श्रद्धा आणि रोहन एकमेकांचे जुने मित्र आहेत. पण सध्या हे नाते मैत्रीपलीकडे गेले आहे. खरे तर आत्तापर्यंत दोघांनीही हे रिलेशनशिप उघड होऊ न देण्याचे आटोकाट प्रयत्न केलेत. पण शेवटी लपवून-लपवून किती लपवणार? काही प्रसंगी अप्रत्यक्ष का होईना, हे प्रेम जगाला दिसलेच. सोशल मीडियावरही या प्रेमाचे काही अप्रत्यक्ष संकेत मिळाले.  

रोहन श्रेष्ठा हा भारतातले दिग्गज फोटोग्राफर राकेश श्रेष्ठा यांचा मुलगा आहे. रोहन याने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत, फोटोग्राफी क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. सध्या रोहन श्रेष्ठा हेही फोटोग्राफी क्षेत्रातले एक मोठे नाव बनले आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shraddha Kapoor was doing shopping in chor bazaar mumbai before coming in bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.